लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Maze Sequenceहा code.org या वेबसाईट वरील दुसरा कोर्स आहे. यातील सर्व स्टेजेसची नावे आणि चित्रे पहिल्या स्टेजप्रमाणेच आहेत. पण पहिला कोर्स अगदी छोट्या मुलांसाठी होता. त्यामध्ये बटणावर त्यांची नावे न लिहिता चित्रे काढलेली होती. हा कोर्स करण्यासाठी इंग्रजी वाचता येणे आवश्यक आहे. 
तुम्ही जर या वेबसाईटवर अकाउंट  उघडला असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही या कोर्सला सुरवात करू शकता.
https://studio.code.org/s/course2/stage/3/puzzle/1यामध्ये तुम्हाला एक मेझ दिसते. त्यामध्ये अँग्री बर्ड गेम मधला अँग्री बर्ड आणि एक पिग दिसतो. आणि मध्यभागात तुम्हाला निळ्या रंगाचे ब्लॉक दिसतात. हे ब्लॉक्स उजव्या भागात नारंगी रंगाच्या ब्लॉक खाली ठेवायचे असतात. त्यानंतर रन हे बटन दाबल्यावर हे ब्लॉक्स एक्झिक्युट होतात. अँग्री बर्ड पिग पर्यंत पोहोचल्यावर एक लेवल पूर्ण होतो.
येथे आपल्याला "move forward" या नावाचा ब्लॉक दिसतो. हा ब्लॉक वापरल्यास अँग्री बर्ड ज्या दिशेकडे पहात आहे त्या दिशेला एक पाउल चालतो.  Turn Left आणि Turn Right हे ब्लॉक्स वापरून तुम्ही त्याला डावीकडे किंवा उजवीकडे वळवू शकता.     


वरील मेझ मध्ये अँग्री बर्डला तीन पावले पुढे जावे लागेल.या मेझ मध्ये अँग्री बर्डला दोन पावले चालून, उजवीकडे वळून, परत एक पाउल चालावे लागेल. तसेच खाली यानंतरच्या लेवल्समधील मेझ मध्ये अँग्री बर्डला पिग पर्यंत पोहोचण्यासाठी ज्या हालचाली कराव्या लागतील त्या कोड ब्लॉक्सची चित्रे दाखवलेली आहेत.   


यानंतरच्या दोन लेवल्स मध्ये प्रश्नांची उत्तरे निवडायची असतात. तर असा हा कोर्स 2 मधील पहिला स्टेज आहे. या कोर्स मध्ये या स्टेजपूर्वी दोन स्टेजेस आहेत, त्यांना अनप्लगड अॅक्टिविटी म्हणतात. ते तुम्ही कोर्सच्या मेनू मधून निवडून पूर्ण करू शकता.  या पुढील लेखामध्ये आपण पुढील स्टेजची माहिती घेऊ.

टिप्पण्या