मुलांसाठी प्रोग्रामिंग - मेझ सिक़्वेन्स

या आर्टिकल मध्ये आपण Code.org या वेबसाईट वरील कोड स्टूडियो मधील Course 1, Stage 3 ,4, 5  बद्दल माहिती घेऊ . 


जेव्हा तुम्ही या वेबसाईट मध्ये लॉग इन करून कोड स्टूडियो हा विभाग उघडता तेव्हा तेथे चार कोर्सेस तुम्हाला दिसतात. 
त्यापैकी पहिल्या कोर्स बद्दल आपण माहिती घेऊ. हा कोर्स वय वर्षे 4 ते 6 या वयोगटातील मुलांसाठी अपेक्षित आहे. पण तुम्ही जर प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेतले नसेल तर हे एकदा नजरेखालून जरूर घालावे. 

या कोर्स मध्ये एकूण 18 स्टेजेस आहेत आणि काही स्टेजेस या Activity या सदराखाली मोडतात, आणि काही स्टेजेस पूर्ण केल्यानंतर ते दिसू लागतात. जेव्हा तुम्ही या कोर्स ला सुरवात करता तेव्हा तुमची सुरवात स्टेज 3 पासून होते, पहिले दोन स्टेजेस या Activities आहेत, व ते नंतर खेळता येतात.

तिसरा स्टेज हा जिगसॉ पझल या प्रकारातला आहे. यामध्ये तुम्हाला एका चित्राचे काही भाग दाखवले जातात, ते जोडून तुम्हाला मूळ चित्र बनवायचे असते. यामध्ये 12 पझल्स आहेत.

चौथा स्टेज हा मेझ सिक़्वेन्स या प्रकारातला आहे. याची थीम ही अँग्री  बर्ड या खेळातली आहे. यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग करून अँग्री बर्डला पिग पर्यंत पोहोवायचे असते. याचे 15 पझल्स आहेत.

पाचवा स्टेज हा  मेझ डी-बगिंग हा आहे. यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग चे इंस्ट्रक्शन्स वाचून त्यातल्या चुका किंवा कमतरता दूर कराव्या लागतात. 
या स्टेजेस ची माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.


Maze Sequence in Marathi by comprolive-com


या मालिकेतील इतर आर्टिकल्स

टिप्पण्या