मुलांसाठी प्रोग्रामिंग - बी लूप्स


या आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या  Course1 मध्ये Stage 14 - Bee Loops चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू. 


या स्टेज मध्ये आपल्याला प्रोग्रामचे लूप्स कसे बनवावे याची माहिती मिळते. एखादी गोष्ट वारंवार करण्यासाठी लूप्स चा वापर केला जातो. 

यामध्ये आपल्याला एका मधमाशीला फुलातील पराग गोळा करून मध बनवायचा असतो. मधमाशीच्या हालचाली अॅरो कमांडने ठरवता येतात. आणि पराग गोळा करण्यासाठी Get हा कमांड तर मध बनवण्यासाठी Make हा कमांड वापरता येतो.

तुम्हाला गुलाबी रंगाच्या Repeat या ब्लॉकचा वापर करून एकसारख्या कमांड्स चे लूप बनवता येते. Repeat या ब्लॉक मध्ये अॅरो वर क्लिक केल्यास आकडे दिसतात, त्यापैकी तुम्ही एक आकडा निवडून तितक्या वेळा कमांडचे लूप बनवू शकता.  
या स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता. 

Bee Loops marathi by comprolive-com

टिप्पण्या