स्पेलिंग बी - अवघड इंग्रजी शब्द शिकण्यासाठी अॅप

प्रत्येकाला आपले इंग्रजी चे ज्ञान वाढवावे असे वाटते. त्यासाठी तुम्हाला आधिकाधिक इंग्रजीचे शब्द माहीत असावेत असेही वाटते. यासाठी दैनंदिन वापरात नसलेले अवघड इंग्रजीचे शब्द शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर स्पेलिंग बी (spelling bee) या अॅपचा वापर करू शकता. हे अॅप विनामूल्य आहे.

हे अॅप इंस्टाल करण्यासाठी तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर (Play Store) मधे  जा. तेथे अॅपस या सदराखाली (spelling bee) या नावाने सर्च करा.

सर्च रिझल्ट्स मध्ये खाली दाखवलेल्या अॅपला इंस्टाल करा. हे अॅप विनामूल्य आहे.


या  अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो 
अॅप इंस्टाल झाल्यानंतर त्याचे आईकॉन असे दिसेल.


अॅप उघडल्यावर त्याचे पहिले स्क्रीन खालील प्रमाणे दिसते.


त्यामध्ये Study या मेनू वर टच केल्यास तुम्हाला एक इंग्रजी शब्द आणि त्याचा अर्थ लिहिलेला दिसेल. त्याच बरोबर एक स्पीकर चे चिन्ह दिसेल, त्यावर टच केल्यास त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला ऐकता येईल. त्यानंतर पुढचा शब्द पाहण्यासाठी स्कीन वर डावी  कडे स्लाईड करावे.नवीन व अवघड इंग्रजी शब्दांचा अभ्यास करण्यासाठी हा अॅप चांगला आहे.

टिप्पण्या