रोल द बॉल्स इंटू अ होल - अँड्रॉइड गेम

आज आपण स्मार्टफोनच्या हार्डवेअर मधील अॅक्सलरोमीटरचा वापर करणाऱ्या एका गेमविषयी माहिती घेऊ. या गेमचे नाव आहे "Roll Balls into a hole"

या खेळामध्ये एक किंवा अधिक छिद्रे दिसून येतात. व आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे,  तसेच लाल रंगाचे छर्रे  किंवा  बॉल दिसून येतात. तुम्हाला स्मार्ट फोन हातात धरून हळुवारपणे किंचितसा खालीवर हलवून हे छर्रे या छिद्रामध्ये ढकलायचे असतात. पण एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती ही कि पहिल्यांदा एकाच रंगाचे सारे छर्रे आत गेल्यानंतर लाल छर्रे जावे. हीच या खेळाची मजा आहे.


पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "Roll Balls" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.या अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅपबद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.


हा अॅप इंस्टाल करण्यासाठी कुठल्याही विशेष परमिशनची आवश्यकता नाही. तुम्ही अॅप इंस्टाल करताना कदाचित या परमिशन्सकडे लक्ष देत नसाल. पण अॅप चालण्यासाठी आवश्यक नसलेली परमिशन्स  मागणारे पब्लिशर या परमिशन्स चा वापर करून तुमच्या स्मार्टफोनवर नको  तितक्या जाहिराती दाखवू शकतात, एवढेच नाही तर यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील माहिती त्या पब्लिशरकडे गोळा होते आणि हया माहितीचा गैरवापर देखील केला जावू शकतो . यासाठी मी या ब्लॉगसाठी अॅप्स निवडताना या परमिशन्स लक्षपूर्वक वाचतो आणि अनावश्यक परमिशन्स मागणारे अॅप टाळतो.हा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो

हा अॅप उघडल्यानंतर  त्याचा स्क्रीन असा दिसेल


यामध्ये इझी, हार्ड आणि लॅबरिन्थ हे तीन मेनू आहेत . हा गेम कसा खेळावा हे तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
टिप्पण्या