अँड्रॉइड फोन साठी लॅबरिन्थ लाईट गेम

लॅबरिन्थ लाईट हा गेम अँड्रॉइड फोनसाठी असलेल्या लॅबरिन्थ या प्रकारातील गेम्समध्ये सर्वात अधिक डाउनलोड केला गेलेला गेम आहे. याच्या फ्री व्हर्जन मध्ये 10 सोपे आणि 10 अवघड लेवल्स आहेत.

हा गेम इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये "Labyrinth" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.

या गेमचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या गेम बद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.

हा गेम इंस्टॉल करण्यासाठी कोणतीही विशेष परमिशन्स मागत नाही. तुम्ही अॅप/ गेम इंस्टॉल करताना कदाचित या परमिशन्सकडे लक्ष देत नसाल. पण अॅप चालण्यासाठी आवश्यक नसलेली परमिशन्स मागणारे पब्लिशर या परमिशन्स चा वापर करून तुमच्या स्मार्टफोनवर नको तितक्या जाहिराती दाखवू शकतात, एवढेच नाही तर यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील माहिती त्या पब्लिशरकडे गोळा होते आणि हया माहितीचा गैरवापर देखील केला जावू शकतो . यासाठी नेहमी अॅप्स/ गेम्स निवडताना हे परमिशन्स लक्षपूर्वक वाचावे आणि अनावश्यक परमिशन्स मागणारे अॅपस/ गेम्स टाळावे.


हा गेम इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतोहा गेम स्टार्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल


हा गेम कसा खेळला जातो हे दाखवण्यासाठी मी एक छोटासा व्हिडीओ तयार केला आहे, तो तुम्ही खाली पाहू शकता.टिप्पण्या