अँड्रॉइड फोन साठी जंगल बुक स्टोरी अॅप

आज आपण जंगल बुक ही गोष्ट सांगणाऱ्या अॅप विषयी माहिती घेऊ. हे एक विनामूल्य अॅप आहे. यामध्ये बारा स्लाईड आहेत. प्रत्येक स्लाईड साधारणपणे एक मिनिटाची आहे. यामध्ये इंग्रजी मध्ये जंगल बुक ची कहाणी सांगितली जाते. एक स्लाईड संपल्यावर डावीकडे स्वाईप करून पुढची स्लाईड पाहता येते. हे अॅप 50 MB चे आहे.

हा अॅप इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये "The Jungle Book" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.

या अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅपबद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.
हा अॅप इंस्टाल करण्यासाठी कोणतीही विशेष परमिशन मागत नाही. तुम्ही अॅप इंस्टाल करताना कदाचित या परमिशन्सकडे लक्ष देत नसाल. पण अॅप चालण्यासाठी आवश्यक नसलेली परमिशन्स मागणारे पब्लिशर या परमिशन्स चा वापर करून तुमच्या स्मार्टफोनवर नको तितक्या जाहिराती दाखवू शकतात, एवढेच नाही तर यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील माहिती त्या पब्लिशरकडे गोळा होते आणि हया माहितीचा गैरवापर देखील केला जावू शकतो . यासाठी नेहमी अॅप्स निवडताना हे परमिशन्स लक्षपूर्वक वाचावे आणि अनावश्यक परमिशन्स मागणारे अॅपस टाळावे.हा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो

हा अॅप स्टार्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेलस्टार्ट बटणावर टच केल्यानंतर पहिले स्लाईड दिसते आणि आपल्याला इंग्रजीमध्ये ही गोष्ट ऐकवली जाते. स्लाईड मधील आवाज थांबल्यावर बोटाने स्मार्ट फोन च्या स्क्रीन वर डावीकडे स्वाईप करावे म्हणजे पुढचे स्लाईड दिसू लागेल. सलग ऐकल्यास ही गोष्ट पंधरा मिनिटात पूर्ण होते.

टिप्पण्या