हे अॅप विनामूल्य आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या 121 फळे व भाजीपाल्याची चित्रे नावे उच्चारासह दर्शविली जातात .
पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "Fruit Words" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.
या अॅप चा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅप बद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.
हा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो तसेच चित्राच्या वरील बाजूस एक पुस्तकाचे आयकॉन आहे, त्याला टच केल्यास त्या चित्रातील फळ किंवा भाजी बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला स्क्रीन वर वाचता येईल.
तसेच शेवटच्या स्पीकरच्या आयकॉनला त्याला टच केल्यास, त्या शब्दाचा उच्चार परत ऐकवला जातो.
मेनू मध्ये परत जाण्यासाठी आपल्या स्मार्ट फोनचे बॅक बटण वापरा.
Favorites - हा मेनू उघडल्यास फक्त तुम्ही स्टार मार्क करून ठेवलेली चित्रे तुम्हाला पाहायला मिळतील. आपण निवडलेली ठराविक चित्रे पाहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कारण या अॅप मध्ये एकूण 121 चित्रे दिलेली आहेत.
Play - या मेनू ला उघडल्यास तुम्हाला त्यामध्ये तीन नावे दिसतील. ही नावे तीन वेगवेगळ्या गेम्सची आहेत.
हे गेम कसे खेळता येतात हे तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता
कोई टिप्पणी नहीं:
टिप्पणी पोस्ट करें