विश्व प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे दाखवणारे अॅप

चित्रकलेच्या इतिहासाबद्दल रुची असणाऱ्यांसाठी मायकेल एनजेलो , रँम्ब्रा,  अणि व्हॅन गॉग इत्यादी जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे पाहायला निश्चितच आवडते. आज मी तुम्हाला एका अशा अॅपची माहिती देणार आहे ज्यामध्ये जगभरातील प्रसिद्ध कलाकारांची 100 हून अधिक चित्रे तुम्हाला तुमच्या  अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहण्यास मिळतील. 

हे एक विनामूल्य  अॅप आहे. या अॅपचे  नाव आहे फेमस पेंटिंग्ज (Famous Paintings) .

पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये  "Famous Paintings" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे  दिसतील. त्यापैकी खाली  दाखवलेल्या  नावावर टच करा.


या अॅप चा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. हा या विषयावरील सर्वात अधिक डाऊनलोड झालेला अॅप आहे.हा अॅप  इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन  असा दिसतो 


हा अॅप  उघडल्यानंतर  त्याचा स्क्रीन असा दिसेल


त्यापैकी गॅलरी या मेनूला टच केल्यास तुम्हाला प्रत्येक पेज वर एक प्रसिद्ध चित्र , त्याची तारीख आणि चित्रकाराचे नाव दिसेल. तुम्ही डावीकडे स्लाईड करून चित्राची पाने पालटू शकता

खाली यापैकी काही चित्रे दाखवली  आहेत 


टिप्पण्या