सोमवार, 26 अक्तूबर 2015

पिन बॉल प्रो अँड्रॉइड गेम

आज आपण पिन बॉल या प्रकारातील एका गेम विषयी माहिती घेऊ. या गेमचे नाव आहे पिन बॉल प्रो. मी जा गेम बद्दल माहिती देत आहे तो या प्रकारातील सर्वाधिक डाउनलोड झालेला गेम आहे आणि हा विनामूल्य पण आहे.


या गेममध्ये वेगवेगळ्या बॅकग्राउंडचे आर्केड दिसून येतात. यापैकी एखादा निवडून स्मार्ट फोनच्या कोणत्याही भागात प्रेस करून बोट उचलल्यास बॉल फेकला जातो व तो आर्केड मधील वेगवेगळ्या अडथळ्यांमधून प्रवास करत खाली येऊ लागतो तेव्हा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर डाव्या आणि उजव्या बाजूला टच करून तुम्ही या गेम मधील फ्लॅपर्स नियंत्रित करू शकता.

हा गेम इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर Games  च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "pinball pro" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.




या अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅपबद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.


हा गेम इंस्टाल करण्यासाठी खाली दाखविलेले दोन विशेष परमिशन मागतो. तुम्ही अॅप इंस्टाल करताना कदाचित या परमिशन्सकडे लक्ष देत नसाल. पण अॅप चालण्यासाठी आवश्यक नसलेली परमिशन्स  मागणारे पब्लिशर या परमिशन्स चा वापर करून तुमच्या स्मार्टफोनवर नको  तितक्या जाहिराती दाखवू शकतात, एवढेच नाही तर यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील माहिती त्या पब्लिशरकडे गोळा होते आणि हया माहितीचा गैरवापर देखील केला जावू शकतो . यासाठी नेहमी अॅप्स निवडताना हे परमिशन्स लक्षपूर्वक वाचावे आणि अनावश्यक परमिशन्स मागणारे अॅपस टाळावे.



हा गेम इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो

हा गेम स्टार्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल


हा गेम कसा खेळावा हे तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.






कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें