सूर्य प्रकाशापासून वीज पुरवठा करणारी स्मार्ट विंडो

Credit: Nikkei Technology

लिथियम आयन बॅटरी ही एक रीचार्जेबल बॅटरी असते. आपल्या मोबाईल फोन मध्ये आणि लॅपटॉप मध्ये ही वापरली जाते. आपण चार्जरच्या मदतीने विजेला जोडून याला रीचार्ज करीत असतो.

एका जपानी संशोधन संस्थेने एक अशी लिथियम आयन बॅटरी बनवली आहे जी दिसायला पारदर्शक आहे व उन्हामध्ये ठेवल्यावर आपोआप रीचार्ज होते.

भविष्यामध्ये याचा उपयोग "स्मार्ट विंडो" म्हणून केला जावू शकतो. ही पारदर्शक बॅटरी खिडकीच्या काचेमध्ये बसवली जावू शकते जी उन्हामध्ये आपोआप रीचार्ज होत राहील व ज्यापासून घरातील किंवा ऑफिस मधील विजेची गरज भागवली जावू शकेल.

याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला खालील पानावर मिळू शकते
http://techon.nikkeibp.co.jp/atclen/news_en/15mk/090100006/

टिप्पण्या