SCIO पॉकेट मॉलीक्यूलर सेन्सर

क्रेडीट: SCIO Pocket Molecular Sensor

कोणत्याही पदार्थाचे रासायनिक विश्लेषण करून त्यांचे गुणधर्म सांगणारे एक स्कॅनर एका इज्राईली कंपनीने बनवले आहे त्याचा वापर करून तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी त्या वस्तूबद्दल सखोल माहिती मिळवू शकता. हे स्कॅनर तुम्हाला हव्या त्या वस्तू समोर धरल्यास ते त्याबद्दल माहिती गोळा करून तुमच्या मोबाईल फोन मध्ये ती माहिती दाखवते . उदाहरणार्थ एखादे फळ पिकले आहे की कच्चे आहे. एखाद्या पेया मध्ये किती कॅलरी आहेत. एखाद्या औषधा मध्ये कोणकोणती रासायनिक द्रव्ये आहेत वगैरे. या स्कॅनर चा वापर दुधामधील भेसळ, तसेच कोणत्याही खाद्य पदार्थामधील भेसळ ओळखण्यासाठी निश्चित केला जावू शकतो.

हे स्कॅनर कंपनीच्या वेब साईट वरून ऑर्डर करून मागवले जावू शकते. तूर्त याची किमत अदमासे 250 डॉलर्स म्हणजे 16 ते 17 हजार रुपये इतके आहे. हे यंत्र लोकप्रिय झाल्यास भविष्यामध्ये याची किमत कमी होईल.

या स्कॅनर बद्दल अधिक माहिती तुम्हाला खालील वेब साईट वर मिळेल.
https://www.consumerphysics.com/myscio/order

या स्कॅनर बद्दल माहिती देण्यासाठी सदर कंपनीने एक व्हिडीओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.


टिप्पण्या