चला खेळूया पायलट हिरो

पायलट हिरो हा विमान उडविण्याचा आणि एकाग्रतेचा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला एक विमान उडवायचे असते. हे विमान तुम्हाला कीबोर्ड  वरील डाव्या आणि उजव्या की वापरून खेळायचे असते. तुम्हाला प्रत्येक लेवल मध्ये एक टास्क दिलेले असते ते तुम्हाला एका मिनिटामध्ये शक्य तितके पार पाडायचे असते. त्यावरून तुम्हाला गुण मिळतात आणि ग्रेड पण मिळतो. प्रत्येक लेवल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागा वरून विमान उडते आणि वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पडायची असतात. खेळण्यासाठी खूपच मनोरंजक व एकाग्रतेने खेळला जाणारा हा गेम आहे. हा गेम तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर च्या ब्राउजर मध्ये विनामूल्य खेळू शकता. त्याच बरोबर हा गेम तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्येही खेळू शकता.

या गेमचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकताहा खेळ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर खेळू शकता


टिप्पण्या