चला खेळूया बीस्ट क्वेस्ट

बीस्ट क्वेस्ट हा एक अॅडव्हेंचर गेम आहे. या खेळामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतो आणि त्याला आपल्या बर्फाळ बेटाला एका जादुगारापासून वाचायचे असते. त्यासाठी त्याला अनेक कोल्ह्याँशी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोन्स्टर्सशी  लढा द्यावा लागतो. तसेच त्याला दडलेला खजिना शोधून काढावा लागतो,  तसेच औषधी वनस्पती आणि इतर दडलेल्या वस्तू शोधून काढाव्या लागतात.

हा खेळ खूप मोठा आहे आणि तो दिवसेंदिवस चालू शकतो. हा खेळ विनामूल्य आहे. miniclip.com या वेब साईट वर तुम्ही अकाऊंट उघडाल तर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हडा खेळ खेळला असेल तो सेव्ह करून ठेवला जातो.  या खेळाच्या माहितीसाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.
तसेच या खेळाच्या टिप्स आणि ट्रिक्स साठी एक वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही खालील लिंक वर पाहू शकता.

Tips and Tricks video
http://www.miniclip.com/videos/watch-501/tips--tricks-beast-quest/en/

हा खेळ तुम्ही खालील लिंक वर खेळू शकता
http://www.miniclip.com/games/beast-quest/en/

टिप्पण्या