अदलाबदलीचा खेळ - सोल शिफ्ट

या खेळाचे नाव आहे सोल शिफ्ट.
या खेळामध्ये लाल आणि हिरव्या रंगाचे गोल आणि चौकोनी आकार दिसतात.
कुठल्याही दोन आकारांवर एकानंतर एक क्लिक केल्यानंतर त्यांची अदलाबदल होते.
सर्व लाल रंगाचे आकार तुम्हाला स्क्रीनवरून नाहीसे करायचे असतात.
प्रत्येक लेवल मध्ये हे आकार वेगवेगळ्या स्थितीमध्ये ठेवलेले असतात.
तुम्हाला समोरील स्थितीचा अभ्यास करून सर्व लाल आकार कसे नाहीसे करता येईल याचा
आडाखा बांधावा लागतो.
लाल रंगाच्या बॅरलवर क्लिक केल्यास त्याचा स्फोट होतो.
एखादा लेवल कसा पूर्ण करावा हे तुम्हाला समजले नाही तर Walkthrough च्या लिंकवर
क्लिक करा.  तेव्हा दुसऱ्या पानावर तुम्हाला Walkthrough चा व्हिडिओ दिसेल.
हा गेम कसा खेळावा हे तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
हा गेम तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता

टिप्पण्या