गीम्प मध्ये मल्टी-लेयर इमेज कशी हाताळावी


वरील चित्र लक्षपूर्वक पहा. या चित्रात डाव्या बाजूला उभ्या पट्टीमध्ये टीम मेनू ऑप्शंस दिलेले आहेत. ही awwapp.com या नावाची वेबसाईट आहे.  या वेबसाईट वर तुम्हाला सरळ स्केच करायला सुरवात करता येते. तसेच तुम्ही केलेले स्केच तुम्हाला लगेचच ऑनलाइन शेअर करता येते. 
तर या व्हाईट बोर्डचे हे मेनू आहेत. पण वेबसाईटवर तुम्हाला एका वेळी फक्त एकाच मेनू एक्सपांड करता येतो. तर मग हे तीनही मेनू एकाच वेळी  एक्सपांड कसे झाले? 
हा चमत्कार आहे गीम्पचा . गीम्प हे विनामूल्य फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर  आहे. या ठिकाणी मी तीन स्क्रीन शॉट घेतले. की-बोर्ड वर PrtSc (Print Screen) ही की दाबून. त्यानंतर तीनही फोटो गीम्प मध्ये सेव्ह केले आणि त्यांना Rectangle Select टूल वापरून वरच्या लेयरचे काही भाग डीलिट केले. अशा रीतीने तीन फोटो तीन लेयरमध्ये ठेवून त्यातील तीनही मेनू एकदम दिसू लागले. हे कसे केले ते  सविस्तर खालील व्हिडिओ मध्ये पहा 

  

टिप्पण्या