गूगल टूल्सची तोंडओळख

गूगलच्या अनेक प्रोडक्ट्सपैकी दैनंदिन वापरात येणाऱ्या काही टूल्सची माहिती आपण घेऊ.

गूगल कॅलेंडर
जर तुम्हाला पुढच्या तारखेत एखाद्या बाबीची नोंद करून ठेवायची असेल तर गूगल कॅलेंडरचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. जर तुम्हाला एखाद्या तारखेला तुम्हाला रिमाइंडर करून पाहिजे असेल तर तुम्ही असे रिमाइंडर सेट करून ठेऊ शकता. खालील लिंक वर तुम्ही गूगल कॅलेंडरचा वापर करू शकता
calendar.google.com

गूगल क्रोम ब्राउजर
गूगलच्या प्रोडक्ट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे प्रोडक्ट् आहे. गूगलचा क्रोम ब्राउजर इतर ब्राउजर पेक्षा अधिक वेगवान व सुरक्षित मानला जातो. गूगलचा क्रोम ब्राउजर तुम्ही खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता
https://www.google.com/chrome/

जीमेल
गूगलचा जीमेल ही सर्वाधिक लोकप्रिय इमेल सर्विस आहे. आपण खालील लिंकवरून जीमेलचे नवीन अकाऊंट  उघडू शकता.
https://mail.google.com/

गूगल मॅप्स
जर तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी जायचे असेल तर गूगल मॅप्स मध्ये जरूर पहा. तुमचा प्रवास सुरळीत होण्यास याची मदत होऊ शकेल.
https://maps.google.co.in/

गूगल डॉक सूट
या मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट, फॉर्म, स्लाईड व ड्रॉईंग तयार करता व सेव करता येतात. हे ऑन लाईन असल्यामुळे तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड असलेल्या कुठल्याही कॉम्प्युटरवर याचा वापर करू शकता.
google.com/docs‎

गूगल सर्च
गूगलची ही सर्वाधिक लोकप्रिय सेवा आहे. यामध्ये एखादी माहिती शब्द टाईप करून, उच्चारून, किंवा चित्र अपलोड करून शोधता येते.
search.google.co.in

गूगल साईट्स
या ठिकाणी आपण विनामूल्य वेबसाईट बनवू शकता
sites.google.com


टिप्पण्या