रंगांचा प्रवाह - फ्लो कलर्स

हा एक मजेत वेळ घालवण्यासाठी चांगला गेम आहे. या खेळामध्ये तुम्हाला चेस सारखा एक बोर्ड दिसतो. त्याच्या चौकोना मध्ये सुबक रंगाचे मोठमोठे ठिपके असतात. तुम्हाला एकाच रंगाचे दो ठिपके दोहोंमध्ये एक रेषा ओढून जोडायचे असतात. एका ठिपक्यावर क्लिक करून, माउस पॉइंटरने ड्रॅग केल्यास (म्हणजे  माउस पॉइंटर खेचून ओढल्यास) रंगाचा एक प्रवाह निर्माण झालेला तुम्हाला दिसतो.
डोळ्यांना आनंद देणारा आणि डोक्याला हलका हलका व्यायाम देणारा हा खेळ आहे. हा एक स्ट्रॅटेजी गेम आहे. तुम्हाला स्क्रीन वरील सामान रंगाचे सर्व ठिपके एकमेकांना जोडायचे असतात. पण एक प्रवाह दुसऱ्या प्रवाहाला आडवा जाता कामा नये.

या खेळाचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकताहा खेळ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून खेळू शकता

टिप्पण्या