फूट पाडा आणि जिंका - डिव्हाइड गेम


हा हा, तुम्हाला कोणामध्येही फूट पाडण्याची गरज नाही. या गेम चे नाव आहे डिव्हाइड.
हा एक साधा सोपा पण मजेदार खेळ आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे लाकडी बोर्ड दिसतात आणि त्यावर माउस पॉइंटर ने एक रेघ ओढल्यास त्या बोर्ड चे तुकडे होतात. पण त्या बोर्ड चे किती तुकडे करायचे हे तुम्हाला सांगितलेले असते आणि तुम्ही त्या बोर्ड वर किती काप मारू शकता यावर मर्यादा असते. तुमचे कौशल्य हेच कि ठराविक काप मारून हवे तितके तुकडे पडायचे, कमी नाही आणि जास्त ही नाही. नाहीतर लेवल परत खेळावा लागतो. या खेळामधील ग्राफिक्स सुबक आहे आणि साउंड इफेक्ट पण छान आहेत.
या गेम कसा खेळावा हे दाखवणारा व्हिडिओ खाली पाहू शकता.हा खेळ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.kongregate.com/games/Gibton/divideटिप्पण्या