ब्लॉक्सोर्झ गेमबद्दल मराठीमध्ये माहिती

हा एक मजेदार आणि खेळण्यास सोपा व मेंदूला चालना देणारा गेम आहे. यामध्ये धातूचा एक ठोकळा
आपल्याला दिसतो, आणि कीबोर्ड वरील की दाबल्यावर तो मागे, पुढे, डावीकडे किंवा उजवीकडे ढकलला
जातो.

तुम्हाला हा ठोकळा ढकलत नेऊन एका चौकोनी (exit) मध्ये टाकायचा असतो. याच्या वाटेत टाईल्स
टाकलेल्या असतात, काही ठिकाणी तुम्हाला गोल आणि X या आकाराच्या वस्तू दिसतात. हे स्वीच आहेत,

यांच्यावर ठोकळा पडल्यास नवीन टाईल्स जोडले जातात. गोल आकाराच्या स्वीचवर ठोकळा आडवा पडला
तरी ते अॅक्टिव्हेट होतात, पण X आकाराचे स्वीच हे ठोकळा उभा थांबल्यानंतरच अॅक्टिव्हेट होतात.

एका स्वीच वर दुसऱ्यांदा दाबल्यास झालेली कृती उलटली जाते, म्हणजे नवीन टाईल जोडला गेला असेल तर
तो काढून टाकला जातो

तसेच या खेळामध्ये पिवळ्या रंगाच्या टाईल्सही दिसतात, त्यांच्यावर हा ठोकळा उभा राहू शकत नाही,
तुम्हाला या पिवळ्या टाईल्सवरून हा ठोकळा आडवा पाडून घरंगळत न्यावा लागतो.
या खेळामध्ये आणखीनही काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला खेळाच्या सुरवातीला लिहिलेले दिसेल.

या गेमचा व्हिडिओ वॉक-थ्रू पाहण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर "Bloxorz" या नावाने सर्च करावे लागेल. हा गेम कसा खेळावा हे तुम्हाला खालील व्हिडिओमध्ये पाहता येईल



हा गेम तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता.

टिप्पण्या