स्टेशनरी गेम - मराठी मध्ये

स्टेशनरी गेम हा वेगाने जाणाऱ्या वस्तूंना ओळखण्याचा खेळ आहे. या खेळामध्ये स्टेशनरी प्रकारातील तीन वस्तू दाखवल्या जातात. आणि वरील बाजूस एक सरकते चित्र दाखवले जाते. हे चित्र या तीन मधील एक असते. तुम्हाला ते कोणते हे ओळखायचे असते. एक चित्र बरोबर ओळखल्यानंतर चित्रांचा दुसरा संच दाखवला जातो. व वरील बाजूस सरकणाऱ्या वस्तूचा वेग ही वाढतो. अशा रीतीने तुमच्या डोळ्याने अति वेगात सरकणाऱ्या वस्तूला ओळखण्याच्या क्षमतेचा कस लागतो.

एक वेगळ्या प्रकारचा हा खेळ आहे, व हा एका विशिष्ट क्षमतेचा अभ्यास करवतो. लहान मुले, वयस्क व जेष्ठ नागरिक असे सर्व वयोगटातील व्यक्ती या खेळाचा आनंद घेऊ शकतात.

हा खेळ आपण खालील व्हिडिओ मध्ये खेळताना पाहू शकता.हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता
http://www.knowledgeadventure.com/games/stationery/

टिप्पण्या