मार्बल लाइन्स गेम - मराठी मध्ये

मार्बल लाइन्स हा खेळ वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. या खेळामध्ये रंगीबेरंगी गोट्यांची एक रंग तुम्हाला सरकत असलेली दिसते. मध्यभागी एक तोफ असते, माउसचे बटन दाबून या तोफेने तुम्ही एक गोती या रांगेमध्ये फेकू शकता. नेम धरण्यासाठी माउस पॉइंटरचा  वापर करावा. एकाच रंगाच्या दोन पेक्षा अधिक गोट्यांना त्याच रंगाच्या गोटीचा नेम लागल्यास त्या गोट्या नाहीश्या होतात. अशा रीतीने ठराविक
वेळेमध्ये सर्व गोट्या नाहीश्या केल्यास एक लेवल पूर्ण होतो. हा खेळ आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/marble-lines/


टिप्पण्या