हॅंगमॅन खेळ -मराठी मध्ये

हॅंगमॅन हा खेळ इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांसाठी व मोठ्यांसाठी उपयोगी आहे. या खेळामध्ये तुम्हाला इंग्रजी चा एक शब्द ओळखायचा असतो. तुम्हाला स्क्रीन वर फक्त त्या शब्दा च्या जागी रिकाम्या जागा दिसतात. पहिल्यांदा तुम्हाला केवळ अंदाजाने त्यामधील एखादे अक्षर ओळखून काढावे लागते. जर तुमचा अंदाज बरोबर निघाला तर ती अक्षरे त्या शब्दातील रिकाम्या जागेमध्ये दिसू लागतात. नंतर त्यावरून तुम्हाला मूळ शब्दाचा अंदाज बांधावा लागतो. एक शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला आठ अक्षरे निवडता येतात. तेवढ्यात तुम्ही तो शब्द ओळखू शकला तर तुम्हाला काही गुण मिळतात, नाही तर शेवटी ते अक्षर स्क्रीन वर दिसू लागते व पुढचा प्रश्न विचारला जातो. अशा रीतीने दहा शब्द ओळखून काढावे लागतात. या खेळाचे प्रात्यक्षिक तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/hangman/

टिप्पण्या