गोल्ड फिशिंग गेम - मराठी मध्ये

गोल्ड फिशिंग हा एक मजेदार खेळ आहे. सर्व वयोगटातील मुले खेळू शकतील असा हा खेळ आहे. या
खेळामध्ये एक हुक लोंबकळताना दिसतो. व खालील बाजूस सोन्याची ढेकळे दिसतात. तुम्ही माउसचे बटन
दाबताच हा हुक खाली फेकला जातो व तो एखाद्या ढेकळाला टेकताच ते सोन्याचे ढेकूळ वर खेचले जाते. तुम्हाला सोन्याच्या ढेकळाचे  स्थान पाहून त्या रेषेत हुक आल्याक्षणी माउस चे बटन दाबावे लागते. तरच नेम बरोबर लागतो. या खेळा मध्ये वेळेचे बंधन असते. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सोने गोळा करावे लागते. एक ठराविक प्रमाणात सोने गोळा झाल्यास लेवल पूर्ण होतो.


हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/gold-fishing/


टिप्पण्या