आपल्या स्मार्टफोनवर स्पीड डायल कसे करावे

या लेखामध्ये आपण आपल्या स्मार्टफोनवर स्पीड डायलची सेटिंग कशी करावी हे पाहू. थोड्या बहुत फरकाने हे बहुतेक अँड्रॉइड फोनवर सारखे असेल.

पहिल्यांदा आपल्या  अँड्रॉइड स्मार्ट फोनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या फोनचे आईकॉन निवडा.


त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वर खालील प्रमाणे मेनू उघडेल.

आता यानंतर तुमच्या फोनच्या खालील बाजूस स्क्रीनच्याही खाली असलेले तीन बटन आहेत त्यापैकी डाव्या बाजूचे बटन प्रेस करा, म्हणजे एक कॉनटेक्स्ट  मेनू उघडेल.


त्यापैकी स्पीड डायल निवडा. त्यामुळे खालील प्रमाणे मेनू उघडेल.


यामध्ये पहिला नंबर व्हॉईस मेल साठी आहे. तर बाकीचे नऊ नंबर तुम्ही स्पीड डायल साठी  वापरू शकता. 
स्पीड डायल साठी क्रमांक निवडा त्यासाठी त्या क्रमांकावर टॅप करा ( म्हणजे हळूच टिचकी मारा ), असे केल्यावर तुमच्या फोनवर असलेल्या फोन नंबर ची यादी उघडेल. ही यादी खाली दाखवल्या प्रमाणे "contacts" आणि इतर कुठला अॅप असेल तर त्यामध्ये ही असू शकते. 


तर आपल्याला हवी ती यादी निवडून "Just once " हा पर्याय निवडावा, म्हणजे तुम्हाला पुढील वेळी दुसरी यादी निवायची असेल तर तसे करता येते.
यामुळे तुमच्या फोनच्या contact ची यादी दिसू लागेल. त्यापैकी आपल्याला ज्या क्रमांकासाठी स्पीड डायल सेट करायचे असेल तो क्रमांक निवडावा. असे केल्यानंतर तो क्रमांक निवडला गेल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल. जर क्रमांक बदलायचा असेल तर स्पीड डायल च्या यादी मधील क्रमांका सामोर असलेल्या (- ) उणे च्या चिन्हा ला निवडल्यास तो क्रमांक काढून टाकला जातो.
आता पुढील वेळी जेव्हा तुम्ही दयाल करता तेव्हा पूर्ण क्रमांक टाईप करीत बसण्या ऐवजी फक्त त्याच्या स्पीड डायल नंबर वर बोट ठेवावे तर तो नंबर टाईप होईल. तर हे बोट काही सेकंद तसेच ठेवल्यावर त्या नंबर ऐवजी पूर्ण फोन नंबर टाईप होऊन त्या नंबरला कॉल देखील जातो. तर अशा रीतीने 2 ते 9 क्रमांकावर आपण नऊ नंबर साठी स्पीड डायल वापरू शकतो.  


टिप्पण्या