ShareIT-मोबाईलवरून कॉम्प्युटरवर फाईली पाठवा

लेनोवो कंपनीने बनविलेले हे विनामूल्य सोफ्टवेअर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन आणि तुमच्या कॉम्प्युटर मध्ये फायीलीची देवाण घेवाण करण्यासाठी वापरता येते. याचा वापर तुमचा स्मार्ट फोन व कॉम्प्युटर एकाच वाय फाय नेटवर्क मध्ये  असताना करता येतो. 


तुम्हाला हे अॅप तुमच्या कॉम्प्युटर वर इंस्टाल करावे लागेल. ते तुम्ही http://kc.lenovo.com/ या वेब साईट  वरून डाऊन लोड करू शकता.
त्याच बरोबर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन "Shareit" चा शोध घ्यावा व त्याला इंस्टाल करावे. 

एकदा दोन्ही उपकरणावर हे सोफ्टवेअर इंस्टाल झाल्यावर, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर वाय फाय नेटवर्क  निर्माण केलेले असेल तर तेथे दोन्ही उपकरणा वर हे सोफ्टवेअर उघडावे. जर फाईली पाठवायच्या असतील तर "send" आणि घ्यायच्या असतील तर "receive" बटणाचा वापर करावा. खालील चित्रामध्ये हे तुम्हाला दिसेल. 
या ठिकाणी संगणकावर या सोफ्टवेअर ची स्क्रीन दिसत आहे. 
या सोफ्टवेअर मध्ये फाईली संगणकावर साठवून ठेवण्या साठी चे पूर्व निर्धारित फोल्डर व त्याला बदलण्याचे असल्यास ते तुम्ही वरील बाजूस उजव्या कोपऱ्यामधील "Options"  या मेनूवर क्लिक करून नंतर "Settings" निवडून करू शकता.
या ठिकाणी मोबाईल वर "SHAREit" चे अॅप उघडलेले दिसत आहे.
मोबाईल मध्ये कॉम्प्युटर चे आईकॉन दिसत आहे. फाईली पाठवण्यासाठी या आईकॉनला निवडावे लागते.
त्यानंतर तुम्हाला संगणकावर त्याची सूचना मिळते.
खालील चित्रामध्ये मोबाईल फोन वर फाईली पाठवलेला मेसेज दिसत आहे.
 खालील चित्रामध्ये कॉम्प्युटर वर फाईली रिसीव्ह झालेला मेसेज दिसत आहे.

टिप्पण्या