स्मार्टफोनवर वर्तमानपत्रे वाचा


"Newshunt" हे स्मार्ट फोनवर वर्तमानपत्रे दाखविणारे अॅप आहे. भारतातील 12 भाषांमधील ऑनलाईन वर्तमानपत्रे यामध्ये वाचता येवू शकतात. तुम्ही अँडरॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्लेस्टोरमध्ये अॅप्स या सदराखाली "newshunt" हे नाव टाईप करून शोध घ्यावा, व सापडल्यास त्याला इंस्टाल करावे. 


सुरवातीला यामध्ये इंग्रजी भाषा निवडलेली असते. आपल्याला इतर भाषेमधील वर्तमानपत्रे वाचायची असल्यास डाव्या कोपऱ्यातील आईकॉनवर स्पर्श करावा. म्हणजे सेटिंग्ज दिसतील.   




वरील मेनू मध्ये "Change My Language"  निवडल्यास दुसरा मेनू उघडेल .

या ठिकाणी तुम्ही हवी ती भाषा निवडू शकता. तुम्ही एकापेक्षा अधिक भाषाही निवडू शकता. त्यानंतर "Save" वर स्पर्श करावा. 

त्यानंतर तुम्हा बातम्या वाचण्याचे अनेक पर्याय दिसतील. त्यामध्ये "Headlines" हा पर्याय निवडा.

या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या भाषेचे टॅब दिसतील. व भाषा निवडल्यास त्या भाषेमधील वर्तमानपत्रे  व टीवी चॅनलच्या  वेबसाईटची यादी दिसून येईल. त्यापैकी एखादा लिंक निवडल्यास ती वेबसाईट उघडेल. 
अशा रीतीने एकाच ठिकाणी वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रातील बातम्या तुम्ही वाचू शकता.   
तुम्ही इतर स्मार्ट फोन वापरत असल्यास त्यावर newshunt चे अॅप इंस्टाल करण्यासाठी newshunt च्या वेबसाईटला या लिंक वर क्लिक करून भेट द्यावी. 

टिप्पण्या