स्मार्टफोनवर फोटो एडीट करताना फोकस इफेक्ट कसा आणावा


या पोस्ट मध्ये आपण स्मार्टफोनवर फोटो एडीट करताना फोटोच्या एखाद्या भागाला हाईलाईट करून बाकीचा भाग अंधुक कसा करावा याची माहिती घेऊ. 

यासाठी आपण पिक्स्लर एक्स्प्रेस हा विनामुल्य अॅप वापरू. जर तुम्हाला या अॅपची माहिती नसेल तर ती तुम्ही या लिंकवर वाचू शकता.

वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे "focal" हा मेनू निवडल्यास खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे एडीट मोड मध्ये फोटो उघडेल.यामध्ये चित्राच्या मध्यभागी दोन वर्तुळे दिसत आहेत. वर्तुळाच्या आतील भाग स्पष्ट दिसतो व बाहेरचा भाग अंधुक होतो. बाहेरील वर्तुळाच्या आतील भाग हा कमी अंधुक व बाहेरील भाग अधिक अंधुक दिसतो.

या वर्तुळाने निवडलेला भाग आपण वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या पांढऱ्या बिंदूवर टच करून त्याला फोटो च्या इतर भागावर सरकवू शकतो.
तसेच वर्तुळांचा आकार देखील परीघावर टच करून कमी किंवा जास्त करू शकतो.

फोकल सेलेक्शन हे वर्तुळाकार किंवा पट्टा असू शकतो. "linear" हा पर्याय निवडल्यास फोटोमध्ये डावीकडून उजवीकडे फोकसचा एक पट्टा दिसतो.
त्याच बरोबर अंधुकपणा कमी किंवा जास्त करण्यासाठी "blurring" या मेनू चा वापर होतो.

टिप्पण्या