सॉफ्टवेयरचे वेगवेगळे प्रकार

या लेखामध्ये आपण सॉफ्टवेयर च्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेऊ. कॉम्प्युटर
चालवण्यासाठी जे अत्त्यावश्यक सॉफ्टवेयर लागते त्याला "सिस्टम सॉफ्टवेयर" असे म्हंटले
जाते. त्याला "ऑपरेटिंग सिस्टम" असे देखील म्हंटले जाते.

आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात विंडोज चे "ऑपरेटिंग सिस्टम" सर्वाधिक वापरले जाते.
या व्यतिरिक्त वापरले जाणारे "ऑपरेटिंग सिस्टम" लिनक्स आणि अॅप्पल मॅकिंतोष हे आहेत.


"ऑपरेटिंग सिस्टम" हे कॉम्प्युटर च्या हार्डवेअर ला चालवण्यासाठी आवश्यक असते, तर कॉम्प्युटर वर आपण वेगवेगळी कामे करण्यासाठी जे सॉफ्टवेयर वापरतो त्यांना "अप्लिकेशन सॉफ्टवेयर" असे म्हंटले जाते.

उदाहरणार्थ "वर्ड प्रोसेसिंग टूल" किंवा "वर्ड प्रोसेसर". विंडोज चे नोट पॅड, वर्ड पॅड, व एम् एस वर्ड ही वर्ड प्रोसेसर ची उदाहरणे आहेत. यामधील नोट पॅड, व वर्ड पॅड हे विंडोज सोबत इंस्टाल करून येते तर एम् एस वर्ड हे सॉफ्टवेयर विकत घ्यावे लागते.

एम् एस वर्ड हे सॉफ्टवेयर एम् एस ऑफिस या सॉफ्टवेयर संग्रहाचा भाग आहे. या वेळी याची किंमत कमीत कमी ५,५०० रुपये तर ऑफिस २०१३ साठी ३१,००० हजार रुपये मोजावे लागतात.

आपण फुकटातले ऑफिस सॉफ्टवेयर वापरून हा खर्च टाळू शकतो. आपण  "ओपन ऑफिस" और "लिबर ऑफिस" सारखे विनामूल्य सॉफ्टवेयर डाऊन लोड करून इंस्टाल करू शकतो. या प्रकारच्या सॉफ्टवेयर ला फ्रीवेअर म्हंटले जाते.

 ऑफिस सूट मध्ये "वर्ड प्रोसेसर" च्या शिवाय "इलेक्ट्रॉनिक स्प्रेड शीट" आणि  "इलेक्ट्रॉनिक प्रेजेंटेशन टूल" यांचा देखील समावेश असतो.

मायक्रोसोफ्ट चे ऑफिस सूट च्या किमती आपण या वेब साईट पर पाहू शकता -
 http://office.microsoft.com

ओपन ऑफिस हे विनामूल्य सॉफ्टवेयर आपण या वेब साईट वरून डाउनलोड करु शकता -
https://www.openoffice.org/download/

लिबर ऑफिस ऑफिस हे विनामूल्य सॉफ्टवेयर आपण या वेब साईट वरून डाउनलोड करु शकता -
http://www.libreoffice.org/

टिप्पण्या