जोड्या लावा - स्मरणशक्तीचा खेळ

हा एक विनामूल्य खेळता येणारा ऑन लाईन गेम आहे. या गेम मध्ये मुलांच्या स्मरणशक्ती चा अभ्यास होतो. एकदा पाहिलेली गोष्ट अचूकपणे ओळखता येण्याच्या क्षमतेचा येथे उपयोग होतो.
या खेळामध्ये तुमच्यासमोर बरेचशे कार्ड मांडून ठेवलेले असतात. एखाद्या कार्ड वर एकदा क्लिक केल्यानंतर त्यामागील चित्र दिसून येते. व परत ते दिसेनाशे होते, तेव्हा वेगवेगळ्या कार्डा मधून समान चित्रांचे कार्ड निवडून त्यांवर एका पाठोपाठ क्लिक केल्यास दोन्ही चित्रे दिसू लागतात. अशा प्रकारे चित्रांच्या जोड्या लावून ठेवण्याचा हा गेम आहे. या मध्ये ठराविक प्रयत्नामध्ये हे  काम पूर्ण करावयाचे असते.

हा खेळ आपण त्याच्या वेब साईटच्या  लिंक वर क्लिक करून खेळू शकता.   खेळण्यासाठी येथे क्लिक करा. 

टिप्पण्या