बँकेतील रक्कम हॕकर्स पासून सुरक्षित कशी ठेवावी

  आजकाल  लोकांचे बँक अकाउंट  हॅक करून त्यामधील रक्कम परस्पर काढून घेण्याच्या घटना घडत अहेत. त्यासंबंधी मी माझे माझे विचार येथे मांडत आहे.

भारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बँका मध्ये  खाते उघडण्याचे स्वातन्त्र्य आहे त्याचा अवश्य वापर करावा.  ज्या  खात्यामध्ये आपली आयुष्य भराची मिळकत जमा केली असेल त्या खात्यासोबत अे टी एम किंवा डेबिट कार्ड चा वापर करू नये. तसेच इंटरनेट बँकिंग किंवा फोन बँकिंग चा देखील वापर टाळावा .

बँकेतील खात्यामधील रक्कम चोरीस जाण्याचे कारण म्हणजे  अे टी एम किंवा डेबिट कार्ड , तसेच इंटरनेट बँकिंग चा वापर करताना तुमच्या अकाउंट संबंधी माहिती चोरली जाणे हे होय.

जर तुम्हाला वरील सुविधांचा वापर करणे अगत्याचे असेल  तर त्यासाठी एक वेगळे बँक अकाउंट उघडून त्यामध्ये  आवश्यक तितकी रक्कम वेळोवेळी भरून ठेवावी, म्हणजे जर  कधी तो अकाउंट हॕक करण्यात आला तर केवळ त्यामध्ये असलेल्या रकमेची चोरी होईल, व दुसऱ्या खात्यामध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित राहील .

टिप्पण्या