Learn Python in Marathi - User input

आज आपण पायथॉन मध्ये यूजर कडून इनपुट कशा रीतीने घेतला जातो हे पाहू

याचा सगळ्यात सोपा मार्ग हा आहे

x = input()
3
print(x)
3

जेव्हा आपण x नावाचे व्हेरिअेबल input() फंक्शन ला असाइन करतो, तेव्हा ही लाईन रन झाल्यावर पायथॉन यूजर कडून इनपुट येईपर्यंत वाट पाहतो, आणि पायथॉन शेल मध्ये यूजर जे काही लिहील त्याला x मध्ये स्टोर करतो. तर हे असे काम करते

पण जेव्हा आपण पायथॉनची स्क्रिप्ट एका फाईली मध्ये लिहून त्याला रन करू तेव्हा यूजर हे समजणार कसे की  पायथॉन कशासाठी वाट बघतोय ते ? त्यामुळे तुम्हाला युजरला समजण्यासाठी काही मेसेज लिहावा लागेल

x = input("input any number : ")
input any number : 44
print("The number you entered is: " , x)
The number you entered is: 44

आता आपण यूजर कडून दोन नंबर घेऊन त्याची बेरीज करू आणि त्याचा रिझल्ट प्रिंट करू. तुम्हाला खालील कोड एक एक लाईन पायथॉन च्या शेल मध्ये टाईप करावा लागेल.

a = input("Enter any number: ")
b = input("Enter another number: ")
print("The sum of the numbers you have entered is: " , a+b)

a = (input("Enter any number: "))
Enter any number: 44
b = (input("Enter another number: "))
Enter another number: 67
print("The sum of the numbers you have entered is: " , a+b)
The sum of the numbers you have entered is:  4467

या ठिकाणी 44 अणि 67 ची बेरीज 4467 दाखवली गेली आहे,म्हणजे पायथॉन ने 44 आणि 67 हे अंक न समजता त्याला अक्षरे म्हणून लिहिले आहे. हा गैरसमज होऊ नये म्हणून संख्या इनपुट करताना int असे सुरवातीला लिहावे

a = int(input("Enter any number: "))
b = int(input("Enter another number: "))
print("The sum of the numbers you have entered is: " , a+b)

असे केल्यास आपल्याला योग्य उत्तर मिळते
The sum of the numbers you have entered is:  111

तर आपण पायथॉन च्या शेल मध्ये अशा रीतीने युजर इनपुट घेऊ शकतो. अब हम इसे पायथॉन की स्क्रिप्ट फाईल, डॉट पाय (.py) फाईल बना कर उसे  पायथॉन के शेल में रन करेंगे

खाली दिलेल्या कोडच्या तीन ओळी टेक्स्ट एडिटर मध्ये पेस्ट करून आपल्या कॉम्प्युटर वर (.py) फाईल एक्सटेंशन लिहून सेव्ह करा. आता या फाईलीला पायथॉनच्या शेल मध्ये File - Open या मेनू मधून ओपन करा. ही स्क्रिप्ट फाईल तुमच्या स्क्रीन वर उघडल्यास हे मेनू बटन  Run - Run Module (or press F5) दाबून स्क्रिप्ट ला रन करा. आणि त्यात एक नाव आणि एक संख्या टाईप करा


name = input("Enter your name : ")
age = input("Enter your age : ")
print("Hello " + name + ", so you are " + age + " years old


पायथॉन च्या शेल मध्ये हा कोड असा रन होईल

Enter your name : Ishan
Enter your age : 9
Hello Ishan, so you are 9 years old !

यापुढील लेख

Learn Python in Marathi - Loop Examples


टिप्पण्या