Learn Python in Marathi - Example 3 - smallest and largest of given numbers

आज आपण पायथॉन मध्ये एक सोपे उदाहरण पाहू. दिलेल्या दोन किंवा तीन अंकापैकी सगळ्यात छोटा कोणता हे आपण शोधू. तुम्हाला पहिल्यांदा युजरला कोणतेही दोन नंबर लिहावयास सांगावे लागेल. प्रत्येक नंबर एका वेगळ्या ओळीवर असावा आणि नंबर टाईप केल्यावर एन्टर दाबून दुसऱ्या ओळीवर जावे लागेल.

दोन नंबर एन्टर केल्यानंतर त्याची तुलना करून त्यातील छोटा नंबर उत्तर म्हणून प्रिंट करावा





युजर ने एन्टर केलेला नंबर आपण  input() या फंक्शन चा वापर करून कालेक्त करतो. या ठिकाणी int(input()) चा अर्थ असा कि एन्टर केलेली संख्या ही पूर्णांक (इन्टिजर) समजली जावी. ही संख्या आपण number1, number2 या व्हेरिअबल मध्ये साठवून ठेवतो आणि त्यांचा वापर प्रोग्राम मध्ये पुढील स्टेटमेंट मध्ये केला जातो.

आता आपण  if - elif - else  स्टेटमेंट पाहू.   if  किंवा  elif  किंवा  else नंतर जी लिहिले जाते त्याला कंडीशन म्हणतात. कंडीशन लिहून झाल्या नंतर कोलन : लिहावा लागतो. प्रोग्राम मध्ये ही कंडीशन पूर्ण झाल्यानंतरच त्या पुढील स्टेटमेंट रन होते.

पायथॉन मध्ये  if - elif - else मध्ये स्टेटमेंटच्या सुरवातीला किंवा शेवटी ब्रॅकेट () किंवा ब्रेसेस {} चा वापर होत नाही. एका लाईनी नंतर दुसरी लाईन लिहिताना जे  इंडेंटेशन केले जाते त्यावरून या स्टेटमेंटची सुरवात आणि शेवट ठरते,

हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल तर त्या नंतर तीन अंक युजर कडून घेऊन त्यातील सगळ्यात छोटा अंक कोणता हे शोधा.



आता आपण पुढील प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा यूजरला हे विचारू की  त्याला किती नंबर एंटर करायचे आहेत. त्या नंतर आपण तितके नंबर यूजर कडून गोळा करू आणि त्या नंबर मधून सगळ्यात लहान आणि मोठा नंबर कोणता हे आपण स्क्रीन वर प्रिंट करून सांगू.

या ठिकाणी आपल्याला पायथॉन ही किती पॉवरफुल लँग्वेज आहे हे समजते. फक्त काही ओळींमध्ये आपण हा प्रोग्राम लिहू शकतो.


यापुढील लेख


टिप्पण्या