Arduino Basics - Read Analog Voltage

click to enlarge
आज आपण आर्डूइनो मध्ये एक प्रयोग करून पाहू. आर्डूइनोच्या  सॉफ्टवेअरमध्ये File - Examples - Basics - ReadAnalogVoltage या ठिकाणी हा प्रोग्राम आपल्याला आढळून येतो.

जर तुम्ही कधी मल्टीमीटर वापरला असेल आणि त्याचा वापर करून एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज मोजले असेल तर हा प्रयोग त्याची नक्कल (simulation) समजावा.


या प्रयोगासाठी वापरले गेलेले साहित्य.
  • आर्डूइनो उनोचा बोर्ड
  • एक ब्रेडबोर्ड
  • 10 किलो ओहम चा एक पोटेन्शिओमीटर
  • तीन जंपर वायरी
याशिवाय तुम्हाला आर्डूइनो उनोचा बोर्ड कॉम्प्युटरशी जोडण्यासाठी त्याचा युएसबी केबल पण लागेल, आणि तुमचा कॉम्प्युटरपण यासाठी वापरावा लागेल. या प्रयोगाची पूर्वतयारी म्हणून तुमच्या कॉम्प्युटरवर आर्डूइनोचे सॉफ्टवेअर (IDE) इंस्टाॅल केलेला असला पाहिजे. 

वरील साहित्य तुम्हाला अॅमॅझॉनच्या वेबसाईटवरून किटच्या स्वरूपात खरेदी करता येईल.

पहिल्यांदा पोटेन्शिओमीटरला ब्रेडबोर्डवर चित्रात दाखवल्याप्रमाणे बसवा. त्याच्या उजव्या बाजूला एक नॉच (खड्डा) दिसतो. त्या बाजूची पिन ब्रेडबोर्डवर ज्या रांगेत बसवली आहे त्याच रांगेत एक काळी जंपर वायर जोडा, मधल्या पिनला पिवळी वायर जोडा, टोकाच्या पीनला एक लाल किंवा नारंगी वायर जोडा.

आता काळ्या जंपर वायरीचे दुसरे टोक आर्डूइनो उनोच्या बोर्ड वर Gnd या पिनला जोडा, लाल वायर 5V या पिनला जोडा आणि पिवळी वायर (सिग्नलची) अॅनॉलॉग पिन क्रमांक A0 ला जोडा.

यानंतर आर्डूइनो उनोचा बोर्ड युएसबी केबलने कॉम्प्युटरला जोडून घ्या, आता या बोर्डवर आपल्याला एक प्रोग्राम अपलोड करायचा आहे. 

या प्रयोगामध्ये वापरलेल्या गेलेल्या मूळ प्रोग्रामची संक्षिप्त आवृत्ती या मी ठिकाणी दिली आहे. हा प्रोग्राम समजून आल्यास मूळ प्रोग्राम समजणे सोपे जाईल.


हा प्रोग्राम  ( File - Examples - Basics ) या मेनू प्रमाणे उघडून घ्या. त्यानंतर अपलोडच्या बटणावर क्लिक करा, अपलोड पूर्ण झाल्यानंतर Tools - Serial Plotter किंवा Monitor उघडा. आता जर तुम्ही पोटेन्शिओमीटरचा नॉब फिरवला तर तुम्हाला व्होल्टेज मधील बदल हा स्क्रीनवर ग्राफ किंवा अक्षरांमध्ये दिसून येईल.

click to enlarge


  

टिप्पण्या