Motion sensor-Arduino Uno Marathi


आज आपण मोशन सेंसर चा प्रयोग करू. या प्रयोगासाठी आपण एक PIR मोशन सेंसर वापरू. या सेंसरला Pyroelectric Infrared (PIr) Motion Sensor असे नाव आहे.


हा सेंसर मी विकत घेतलेल्या आरडूइनो च्या स्टार्टर किट सोबत मिळाला. तुम्हालाही जर हा स्टार्टर किट विकत घ्यायचा असेल तर त्याचे लिंक मी येथे देत आहे.
http://amzn.to/2iCKJ8R

जर तुम्हाला फक्त हा सेंसरच घ्यायचा असेल तर त्याचे लिंक मी येथे देत आहे
http://amzn.to/2jfXrsU

या प्रयोगासाठी आपण एक पॅसिव्ह बझर पण वापरणार आहोत. याला Arduino Compatible Passive Speaker Buzzer म्हणतात. हा बझर देखील माझ्या आरडूइनो च्या स्टार्टर किट सोबत मिळाला आहे. जर तुम्हाला फक्त हा बझरच घ्यायचा असेल तर त्याचे लिंक मी खाली देत आहे.
http://amzn.to/2jfZtJq

या प्रयोगामध्ये आपण आरडूइनो उनोचा  बोर्ड पण वापरू. हा तुम्हाला स्टार्टर किट सोबत मिळेल. जर तुम्हाला फक्त हा बोर्ड घ्यायचा असेल तर त्याचे देखील लिंक मी खाली देत आहे.
http://amzn.to/2ixNkhf

या प्रयोगामध्ये  मी एक 9V ची बॅटरी वापरली आहे, हा  प्रोजेक्ट प्रोग्रामिंग पूर्ण झाल्यावर कॉम्प्युटर पासून वेगळा करून त्याला इतरत्र हलवता येते.  त्यावेळी आरडूइनो उनोच्या बोर्डला सप्लाय देण्यासाठी ही बॅटरी वापरता येते.

ही बॅटरी स्टार्टर किट सोबत मिळाली नाही, त्यामुळे मला ती वेगळी विकत घ्यावी लागली. जर तुम्हाला पण 9V ची बॅटरी  (Duracell Alkaline Battery 9V ) विकत घ्यायची असेल तर त्याचे लिंक मी येथे खाली देत आहे.
http://amzn.to/2jqp18O

या बॅटरी सेल ला आरडूइनोशी जोडण्यासाठी एका होल्डरची गरज भासेल, माझ्या स्टार्टर किट मध्ये हे होल्डर मला मिळाले. जर तुम्हाला असे होल्डर विकत घ्यायचे असेल तर त्याचे लिंक मी येथे खाली देत आहे.
http://amzn.to/2jW4b2b




PIR सेंसर वरील चित्रा प्रमाणे दिसतो. याला कनेक्ट करण्यासाठी तीन पिना असतात. ज्यांच्यावर  VCC, OUT आणि  GND असे लिहिलेले असते. पिनवर नाही पण बोर्डावर.

VCC लिहिलेल्या पिनला आरडूइनोच्या 5V शी आणि  GND च्या पिनला आरडूइनोच्या ग्राउंडशी जोडावे . OUT लिहिलेल्या पिनला आरडूइनोच्या  डिजिटल पिन 3 ला जोडावे. डिजिटल पिनांमध्ये कोणतीही पिन निवडता येते पण मग त्या  पिनचा क्रमांक प्रोग्राम मध्ये लिहावा लागतो




जर PIR सेंसरला वर  चित्रात दाखवल्याप्रमाणे पहिले तर तेथे दोन पोटेंशियोमीटर दिसतात. सुरवातीला ते याच पोजीशन मध्ये दिसतात  याशिवाय तुम्हाला जम्परच्या तीन पिना दिसतील त्यामधील दोन पिनांवर जंपर बसवलेला दिसेल. सुरवातीला हा सिंगल ट्रिगर च्या पोजीशन वर असेल. तुम्ही या जम्परला वेगळे करून त्याची पोजिशन बदलू शकता.
डावीकडील  पोटेंशियोमीटरटाइम डिलेचा आहे .  हा सुरवातीला 2.5 सेकंदावर सेट केलेला असेल. याला तुम्ही स्क्रू ड्राइवर वापरून उजवीकडे फिरवू शकता. टाइम डिले वापरण्यासाठी जम्पर सिंगल ट्रिगर मोड़ मध्ये  असला पाहिजे. जर तुम्ही टाइम डिलेचा नॉब उजवीकडे (क्लॉक वाईज) फिरवाल तर बझर वाजण्याचा वेळ वाढत जाईल आणि LED पण तितकाच वेळ चालू राहील. माझ्या प्रयोगात हा वेळ 3 मिनिटा पर्यंत वाढवता आला.

जर जम्पर रिपीट ट्रिगर साठी सेट केला तर 4 सेकंदा नंतर बीप बंद होईल आणि सेंसर परत अॅक्टिव्हिटी डिटेक्ट करणे सुरु करेल.


दूसरा  पोटेंशियोमीटर सेंसिटिव्हिटी म्हणजे रेंज साठी वापरला जातो. सुरवातीला हा मिनिमम व  सेट केलेला असतो, त्यावेळी हा 3 मीटरपर्यंत हालचालीला डिटेक्ट करू शकतो. त्याला उजवीकडे (क्लॉक वाईज)  फिरवल्यास त्याची रेंज रेंज 7 मीटर तक बधाई जा सकती है. इसे आप कर के देख सकते हो.

आरडूइनो उनोच्या  बोर्डशी या कॉम्पोनन्ट्स ला कसे कनेक्ट करावे हे खालील चित्रात दाखवले आहे.


तुम्ही हे चित्र एनलार्ज करून पाहू शकता. वरील चित्रात दाखवलेले बझर दोन पिनांचे आहे. पण प्रत्यक्ष्यात मी वापरत असलेला बझर तीन पिनांचा आहे. 

यामध्ये  S लिहिलेली पिन सिग्नलसाठी आहे.  याला आपण आरडूइनो उनो च्या  पिन 9 शी जोडू आणि  - लिहिलेल्या पिनला आरडूइनो उनोच्या कोणत्याही ग्राउंड  पिन शी जोडता येते. मधली पिन आपण वापरणार नाही.


या प्रयोगामध्ये  कॉम्पोनन्ट्सला आरडूइनो उनोशी जोडण्यासाठी मी पाच (5 ) Male-Female Dupont wires वापरले आहे . हे वायर्स स्टार्टर किट सोबत मिळतात. जर तुम्हाला हे वायर विकत घ्यावे लागत असेल तर त्यासाठीचे लिंक मी येथे खाली देत आहे

http://amzn.to/2iyjMQA

येथे मी एक LED पण 13 क्रमांकाच्या पिनशी आणि GND शी जोडला आहे. LED चा लांब पाय 13 मध्ये आणि छोटा पाय पिन GND मध्ये. असे फक्त 13 क्रमांकाच्या पिनसोबतच करता येते. आरडूइनो उनोच्या बोर्डवर 13 क्रमांकाच्या पिनशी एक पुल अप रजिस्टर जोडलेला असतो. जर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या पिनशी LED जोडायचा असेल तर तुम्हाला त्यासोबत एक 220 ओहमचा रजिस्टर पण जोडावा लागेल नाही तर  LED खराब होऊ शकतो.

प्रोग्राम


सारे कॉम्पोनन्ट्स आरडूइनो उनोशी जोडल्यानंतर कंप्यूटरच्या   USB पोर्टशी जोडावे. आणि त्यानंतर खालील लिंक वर दिलेला प्रोग्राम त्यामध्ये अपलोड करावा.
https://goo.gl/MbF68w

वरील प्रोग्राम ला डाऊनलोड करून त्याला आरडूइनोच्या  IDE मध्ये उघडा. आणि त्यानंतर पहिल्यांदा  Verify, आणि त्यानंतर  Upload च्या बटनावर क्लिक करा. तव्हा हा प्रोग्राम आरडूइनोच्या  मायक्रो कंट्रोलर मध्ये अपलोड होईल. अपलोड पूर्ण झाल्यानंतर " Done Uploading" असा मेसेज दिसेल आणि PIR सेंसर एक्टिवेट होईल. जर तुम्ही सेंसर समोर  तुमच्या हाताची हालचाल कराल तर बझर वाजायला सुरवात होईल आणि LED पण पेटेल.

आता तुम्ही आरडूइनोच्या बोर्डला कंप्यूटर पासून वेगळा करून 9v च्या बॅटरीशी जोडून त्याला घरात कोणत्याही ठिकाणी ठेवून टेस्ट करू शकता.

बझरचा आवाज तुम्ही खालील फंक्शन मध्ये बदलू शकता. प्रयोग म्हणून 200 ते 2000 पर्यंत वेगवेगळे आकडे लिहून प्रोग्राम अपलोड करून बझरच्या आवाजातील फरक ऐका.

tone(9, 400);

या फंक्शन मधील पहिला आकडा हा आरडूइनोचा पिन क्रमांक आहे जेथून आपण बझरला कनेक्शन दिले आहे.

व्हिडिओ 

या प्रयोगासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.








टिप्पण्या