गेम बनवूया - तोफ उडवायचा गेम



वरील चित्रावर  क्लिक केल्यास या गेमला सुरवात होईल. यामध्ये एक तोफ आहे जी बॉल फेकते. या तोफेला लेफ्ट आणि राईट अॅरो कीज वापरून डावी - उजवीकडे फिरवता येते.


स्पेस बार दाबल्यावर यामधून एक बॉल फेकला जातो. हा गेम 30 सेकंदापर्यंत चालतो. वर तुम्हाला एक चौकोनी आकाराची वस्तू दिसते, तुम्हाला तोफेचे तोंड या वस्तूच्या  दिशेला करून बॉल फेकायचे असतात. एका वेळी एकच बॉल फेकता येतो.

जर तुम्ही तीस सेकंदात वीस बॉल या चौकोनी आकृतीवर फेकले तर तुम्ही जिंकता. बॉलच्या वाटेमध्ये काळ्या रंगाची वर्तुळे दिसतात. या वर्तुळापासून बॉलला दूर ठेवावे लागते. जर बॉलचा स्पर्श या वर्तुळाला झाला तर बॉल लगेचच नाहीसा होतो.

हा  गेम कसा बनवला गेला आहे हे तुम्ही या प्रोजेक्टच्या होम पेज वर पाहू शकता.

https://scratch.mit.edu/projects/108735443/

आता आपण या गेमचे नवीन संस्करण बनवू. यामध्ये स्पेस बार दाबल्यावर बॉल्सची  एक रांग बाहेर पडेल. हा  गेम तुम्ही खाली क्लिक करून खेळू शकता. या गेम चे कोडिंग  तुम्हाला  या  लिंक वर   दिसेल.

नवीन संस्करण 


टिप्पण्या