सुरक्षा - संगणकाची # कास्परस्की

आज आपण  तुमच्या संगणकाच्या सुरक्षे साठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर विषयी माहिती घेऊ. तुम्हाला या साठी बरेचसे सॉफ्टवेअर मिळतील. कास्परस्की इंटरनेट सिक्युरिटी हा एक उत्तम पर्याय आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही अँड्रॉइड फोन आणि तुमच्या विंडोज तसेच मॅकिंतोष संगणकावर देखील इंस्टाल करू शकता.  याचे एक व्हर्जन असे आहे ज्यामध्ये तुम्ही घरात वापरत असलेल्या वेगवेगळ्या संगणक, टॅब, स्मार्ट फोन इत्यादी पाच उपकरणावर हे सॉफ्टवेअर वर्षभरासाठी वापरू शकता. याचे वेगवेगळे व्हर्जन आपण शेवटी पाहू.


संगणकावर इंस्टालेशन 

तुम्ही कास्परस्कीच्या वेब साईट वरून तुम्हाला हवे ते व्हर्जन निवडून त्याला इंस्टाल करू शकता. ज्या वेळी तुम्ही हे इंस्टाल करता तेव्हा त्याचे ट्रायल व्हर्जन इंस्टाल होते आणि ते महिना भर चालते. यामध्ये सर्व सोयी पूर्ण पणे वापरता येतात. पण महिन्या नंतर तुम्हाला ते विकत घ्यावे लागते.  कास्परस्कीचे विनामूल्य व्हर्जन हे फक्त अँड्रॉइड फोन साठी आहे. एकदा प्रोग्राम इंस्टाल झाल्यानंतर तुम्हाला डेस्क टॉप वर आणि टास्क बार वर याचे आइकॉन दिसू लागतात. तेथून तुम्ही या प्रोग्रामला उघडू शकता.


संगणकावरील मेनू अॉप्शंस 

विंडोच्या खालील बाजूला दिसणाऱ्या पट्टीला  टास्क बार असे म्हणतात. टास्क बारच्या उजव्या बाजूला आपल्या कॉम्प्युटर वर चालत असलेल्या प्रोग्रामचे आईकॉन दिसून येतात. येथे तुम्हाला कास्परस्की चा आइकॉन दिसेल. त्यावर राईट क्लिक केल्यास एक मेनू दिसू लागतो.


या मेनू मधील वेगवेगळ्या अॉप्शंस ची माहिती आपण घेऊ 

Task Manager - या ठिकाणी क्लिक केल्यास कास्परस्की चा टास्क मॅनेजर उघडतो. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या संगणकावर सापडलेल्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स ची माहिती दिली जाते. येथून तुम्ही त्यांना दूर करू शकता. तसेच जे स्कॅन केले गेले त्यांची यादी पण दिसते.




Run Update - या ठिकाणी क्लिक केल्यास कास्परस्कीचा डाटा बेस अपडेट केला जातो. हे काम स्कॅन करण्या पूर्वी देखील आपोआप केले जाते. त्यामुळे वेगळे अपडेट करण्याची गरज भासत नाही.



Tools - Application Activity - या ठिकाणी क्लिक केल्यास जो विंडो उघडतो त्यामध्ये तुमच्या संगणकावर या वेळी चलत असलेल्या वेगवेगळ्या अप्लिकेशनची नावे व त्यांच्या बद्दल इतर माहिती दिसते. 



Tools - Network Monitor - या ठिकाणी क्लिक केल्यास जो विंडो उघडतो त्यामध्ये तुमच्या संगणकावर या वेळी इंटरनेटचा  वापर करत असलेल्या वेगवेगळ्या अप्लिकेशनची नावे व त्यांच्या बद्दल इतर माहिती दिसते.


Tools - On Screen Keyboard -  या ठिकाणी क्लिक केल्यास स्क्रीन वर एक की बोर्ड दिसू लागतो. याचा वापर माउस च्या सहाय्याने केला जातो. ज्या ठिकाणी संगणक सुरक्षित आहे किवा नाही याची खात्री नसेल, म्हणजे कॉम्प्युटर च्या कीबोर्ड वरील की प्रेस हे चोरून नोंदवले जात असतील अशी शंका ज्या ठिकाणी असेल तेथे हा ऑन स्क्रीन कीबोर्ड वापरून तुम्ही आपली माहिती सुरक्षित ठेऊ शकता.

  

Pause Protection - काही वेळा तुम्हाला संगणकावरील अँटी व्हायरस थोड्या वेळासाठी बंद करण्याची आवश्यकता भासते. अशा वेळी या  ठिकाणी क्लिक करून तुम्ही हवे तितक्या वेळासाठी असे करू शकता.



Enable Parental control - या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पटकन पॅरेंटल कंट्रोल चालू किंवा बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड एंटर करावा लागेल. पॅरेंटल कंट्रोल च्या सेटिंग्स या पूर्वीच ठरवून ठेवाव्या लागतात. ते आपण नंतर पाहू.


Settings - येथे क्लिक केल्यास कास्परस्कीच्या सेटिंग चा विंडो उघडतो. येथून तुम्ही या सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या अॉप्शंस वर नियंत्रण ठेऊ शकता. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला हवी असल्यास मला सांगा. 


Safe Money

कास्परस्की मध्ये ऑनलाईन देवाण घेवाण सुरक्षित व्हावे म्हणून काही उपाय केले गेले आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या फोर्म मध्ये पास वर्ड भरता तेव्हा कास्परस्की चे "Secure keyboard input" असे पॉप अप दिसते. या वेळी "printscreen" डिसेबल केले जाते. असे केल्यामुळे जर कोणी तुमचा पासवर्ड स्क्रीन शॉट काढून चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आळा बसतो.

 त्याच बरोबर आर्थिक व्यवहार ज्या वेब साईट वर तुम्हाला करायचे असतात ते सुरक्षित व्ह्वावे म्हणून "सेफ मनी " नावाची सोय केलेली आहे. यामध्ये तुम्ही हव्या असलेल्या वेब साईट ची नावे टाका, म्हणजे तुमच्या बँक ची वेब साईट, किंवा तुम्ही जेथून काही ऑनलाईन खरेदी करता ती वेब साईट.
यामध्ये प्रोटेक्टेड ब्राउजर हे ऑप्शन आहे. सुरक्षितते साठी ते निवडा. वेब साईटची नावे जोडून  झाल्यास मुख्य विंडो मध्ये त्यांची नावे दिसू लागतात. दर वेळी डेस्कटॉप वरील शार्टकट कट वापरून "सेफ मनी" चा विंडो उघडावा अणि त्यामधे तुम्ही जोडलेल्या नावापैकी हव्या त्या वेबसाईट समोरील  "Run Protected Browser" या लिंकवर क्लिक करावे. असे केल्यास तुमचा ब्राउजर हा प्रोटेक्टेड मोड मध्ये चालू लागतो. यावेळी संगणकावरील व्हायरस तुमच्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेऊ शकत नाही.  

वेगवेगळे व्हर्जन 

कास्परस्की चे वेगवेगळे व्हर्जन उपलब्ध आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. कास्परस्कीच्या सॉफ्टवेअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेक्शन आणि सोयी दिलेल्या आहेत. व त्यानुसार त्यांचे व्हर्जन आहेत.

सर्वात अधिक सोयी असलेल्या व्हर्जनला  "Kaspersky Pure - All in one protection" किंवा "Kaspersky Total Security - Multi Device" असे नाव दिलेले आहे.
यामध्ये डिजिटल अॅसेट प्रोटेक्शनच्या सोयी आहेत, जे इतर व्हर्जन मध्ये नाहीत. तीनही व्हर्जन च्या सोयींच्या तुलनेचे एक पान आहे, येथे सविस्तर माहिती वाचून तुम्ही तुम्हाला हवे ते व्हर्जन निवडू शकता.
http://www.kaspersky.co.in/comparison 

Kaspersky Internet Security - Multi Device - या व्हर्जन मध्ये तुम्हाला पाच उपकरणावर वेगवेगळी पाच सॉफ्टवेअर इंस्टाल करण्याचे लायसन्स मिळते. म्हणजे एक विंडोज चा कॉम्प्युटर, एक मॅकिंतोष, एक एंड्राइड फोन, एक विंडोज फोन अणि एक IOs device, म्हणजे आईफोन, किंवा आईपॅड. तर हे पाच वेगवेगळ्या सॉफ्टवेअर चे एकत्रित लायसन्स आहे. यामध्ये खालील सॉफ्टवेअर वापरता येतात.

  1. Kaspersky Internet Security 
  2. Kaspersky Internet Security for Мас
  3. Kaspersky Internet Security for Android
  4. Kaspersky Safe Browser for Windows Phone
  5. Kaspersky Safe Browser for iOS
Kaspersky Internet Security - हा पर्याय एक ते तीन संगणकासाठी उपलब्ध आहे. डिजिटल अॅसेट प्रोटेक्शन ची तुम्हाला गरज नसेल तर हा पर्याय कमी खर्चाचा आहे. यामध्ये एंटी व्हायरस तसेच इन्टरनेटशी जोडले गेलेल्या संगणकाच्या सुरक्षेचे सर्व उपाय उपलब्ध आहेत.

Kaspersky Antivirus - हा पर्याय इंटरनेटशी न जोडल्या गेलेल्या संगणकासाठी वापरला जावू शकतो. याचा खर्च सर्वात कमी आहे. 

  



टिप्पण्या