सुरक्षा - अँड्रॉइड फोनची # कास्परस्की

आज आपण अँड्रॉइड फोन साठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर विषयी माहिती घेऊ. तुम्हाला या साठी बरेचसे अॅप्स मिळतील. कास्परस्की इंटरनेट सिक्युरिटी फॉर अँड्रॉइड फोन हा एक उत्तम पर्याय आहे. याचे एक विनामूल्य व्हर्जन आहे व एक प्रीमिअम व्हर्जन आहे ज्यामध्ये अधिक सोयी आहेत.

अँड्रॉइड फोन वर इन्स्टालेशन 

हे अॅप इंस्टाल करण्यासाठी -

  • प्रथम तुमच्या स्मार्ट फोनचा प्ले-स्टोर उघडा 
  • तेथे वरील बाजूस "kaspersky" असे लिहून सर्च करा
  • तुम्हाला बरीचशी नावे दिसतील. त्यामधे "Kaspersky Internet Security" या नावावर टच करा.
  • त्यानंतरच्या स्क्रीन वर "install" या बटनावर टच करा.
  • तुम्हाला परमिशन ची स्क्रीन दिसेल. त्यावर "Accept" या बटणावर टच करा.
  • असे केल्यावर त्याचे इंस्टालेशन पूर्ण होवून त्याचा आइकॉन तुमच्या स्क्रीन वर दिसू लागेल 
  • षटकोणी हिरव्या रंगाचा हा  आइकॉन आहे व त्याखाली "internet security" असे लिहिलेले आहे.

पहिल्यांदा वापर

 

याचे विनामूल्य व प्रीमिअम असे दोन प्रकार आहेत. विनामूल्य प्रकार हा सुरवातीला इंस्टाल होतो. त्यामध्ये खालील चित्रात दाखवलेल्या सुविधा आहेत. तर पिवळ्या रंगाने मार्क केलेल्या सुविधा या प्रीमिअम प्रकारात उपलब्ध आहेत. 




खरेदी 

यामधील प्रीमिअम प्रकारातील सुविधा तुम्हाला विकत घ्याव्या लागतात. 

  • त्यासाठी पहिल्या स्क्रीन वर खालील बाजूस "Real Time Protection" लिहिलेल्या बटणावर क्लिक करावे. 
  • त्यानंतरच्या स्क्रीनवर "Get All Features" लिहिलेल्या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतरच्या स्क्रीन वर "Purchase a License" असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करावे



याठिकाणी "Continue" या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन दिसून येते


या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चा वापर करून त्याचे पैसे भरू शकता.


30 दिवसाचे ट्रायल 

हा अॅप इंस्टाल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्यामधील प्रीमिअम सोयींची माहिती देणारे पान दिसते. ते डावीकडे स्लाईड करत गेल्यास आणखीही पाने दिसतात. शेवटी खालील पान दिसू लागते. यामध्ये "Try For Free" असे लिहिलेले आहे, त्या ठिकाणी टच केल्यास तुम्ही तीस दिवस प्रीमिअम सोयींचे ट्रायल घेऊ शकता. तीस दिवसानंतर हवे असेल तर या सोयी सुरु ठेवण्यासाठी वर दाखवल्याप्रमाणे पैसे भरू शकता किंवा विनामूल्य सोयी सकट अॅपचा वापर चालू राहील.


कास्परस्की अॅप मधील मेनू ऑप्शंस 

 
Scan - या आइकॉन वर क्लिक केल्यास तुम्हाला खलील  प्रमाणे तीन पर्याय दिसून येतात. जर सवड असेल तर फुल स्कॅन करून पहावा. 


Update - हे आइकॉन व्हायरस डाटाबेस अपडेट करण्यासाठी वापरता येते. 
Real Time Protection - ही व्यवस्था फक्त तीस दिवसाच्या ट्रायल पिरिअड मध्ये आणि त्यानंतर विकत घेतल्यास उपलब्ध होते. 
 Call and Text Filter - या ऑप्शन चा वापर करून तुम्ही एखाद्या फोन नंबर वरून येणारे टेक्स्ट मेसेजेस, आणि कॉल्स किंवा फक्त मेसेजेस किंवा कॉल्स ब्लॉक करू शकता. यामध्ये फिल्टर रुल्स देखील अॅड करू शकता. 

Anti Theft - जर कधी तुमचा स्मार्ट फोन गहाळ झाला तर अशा परिस्थिती मध्ये तुम्ही तुमचे नुकसान कमीत कमी व्हावे याची तयारी करून ठेऊ शकता. यामध्ये वेगवेगळे सिनॅरिओ आहेत.

  1. तुमचा फोन गहाळ झाला, तुम्ही कुठे विसरलात. आणि ज्या व्यक्तीला तो सापडला तो तुम्हाला परत करू इच्छितो.
  2. तुमचा फोन गहाळ झाला आणि ज्या व्यक्तीला तो सापडला तो तुम्हाला परत करण्याच्या मनस्थितीत नाही.
वरील दोन्ही परिस्थिती मध्ये तुम्हाला वेगवेगळे उपाय योजावे लागतात. वरील दोन्ही स्थितीमध्ये काय काय उपाय उपलब्ध आहेत ते तुम्ही या मेनू ऑप्शनमध्ये पाहू शकता. ही सुविधा कास्परस्की च्या फ्री व्हर्जन मध्ये देखील उपलब्ध करून दिलेली आहे.

या शिवाय प्रीमिअम व्हर्जन मध्ये उपलब्ध असलेल्या सोयी मध्ये
Text Anti Phishing - SMS मध्ये जर एखाद्या धोकादायक वेब साईट ची लिंक असेल तर ती ओळखून ब्लॉक केली जाते.
Web Protection - हा ऑप्शन निवडल्यास  तुमच्या स्मार्ट फोनच्या ब्राउजर सोबत स्कॅनर जोडला जातो आणि इंटरनेट वरील धोकादायक वेबसाईटला तो तुमच्या फोनमध्ये येऊ देत नाही.

Privacy Protection - कास्परस्की मध्ये ही एक मजेदार सोय आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या कॉल लॉग आणि कॉन्टेक्ट्स मध्ये काही नंबर लपवून ठेऊ शकता.


यासाठी पहिल्यांदा "contacts to hide" मध्ये तुम्हाला हवे ते फोन नंबर टाकायचे, आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला हे नंबर लपवायचे असतील तेव्हा "Privacy Protection" चे स्लायडर उजवीकडे सरकवायचे. असे केल्यानंतर कोणीही तुमचा फोन हातात घेऊन त्यामध्ये पाहिल्यास हे नंबर दिसून येणार नाहीत. व हवे असल्यास परत हे "Privacy Protection" ऑफ केल्यानंतर ते नंबर दिसू लागतील. "Privacy Protection" तुमच्या खेरीज इतरांना ऑफ करता येत नाही कारण त्यासाठी पासवर्ड टाकावा लागतो.

या अॅपच्या वापरा बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मला विचारू शकता.

टिप्पण्या