लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Flappy Bird

हा Code.org Code studio मधील दुसऱ्या कोर्सचा सोळावा भाग आहे. याच्या मध्ये तुम्हाला फ्लॅपी बर्ड नावाचा गेम बनवण्याची माहिती दिली जाते. यामध्ये एकूण दहा लेवल आहेत. प्रत्येक लेवलमध्ये या गेममधील वेगवेगळ्या इव्हेन्ट्स आणि अॅक्शन्सची माहिती दिली जाते.

हा भाग तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. 
https://studio.code.org/s/course2/stage/16/puzzle/1

या  गेममध्ये वेगवेगळे इव्हेन्ट्स खालील प्रमाणे आहेत "When Run", "When Click", "When Pass Obstacle", "When hit an obstacle" and "When hit ground". आणि प्रत्येक इव्हेन्टला कुठले अॅक्शन व्हावे हे तुम्ही ठरवू शकता. उजव्या पॅनल मध्ये  इव्हेन्टचे ब्लॉक्स दिसतात. मध्य भागातील पॅनलमध्ये अॅक्शनचे ब्लॉक्स दिसतात. हे तुम्हाला उजव्या बाजूला इव्हेन्टच्या ब्लॉक्स खाली नेवून ठेवता येतात. यातील नऊ लेवल मध्ये तुम्हाला याचे प्रशिक्षण मिळते आणि दहाव्या लेवल मध्ये तुम्ही या गेमला तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन करू शकता. खालील चित्रामधे तुम्हाला हे ब्लॉक्स दिसतात. चित्रावर क्लिक करून तुम्ही त्याला एनलार्ज करून पाहू शकता.  



टिप्पण्या