मुलांसाठी प्रोग्रामिंग - प्ले लॅब

आज आपण Code.org या वेबसाईट वरील पहिल्या कोर्सच्या सोळाव्या स्टेजबद्दल माहिती घेऊ. प्ले लॅब - क्रिएट अ स्टोरी या स्टेज मध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्राला चालते आणि बोलते करायचे असते. तुम्ही या वेबसाईट वर अकाउंट उघडले असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हा चॅप्टर उघडू शकता. 
 https://studio.code.org/s/course1/stage/16/puzzle/1



वरील चित्रामध्ये आपल्याला एक श्वान दिसत आहे. व मध्यभागात एक निळ्या रंगाचा ब्लॉक दिसतो. तुम्हाला हा ब्लॉक सरकवून उजव्या भागात न्यायचा असतो आणि त्यामध्ये क्लिक करून "Hello World" असे लिहायचे असते. निळा ब्लॉक हा भगव्या रंगाच्या ब्लॉक च्या खाली नेवून ठेवावा. त्यानंतर रन बटन क्लिक करावे. असे केल्यास स्क्रीन वर दिसणारा श्वान "Hello World" ही अक्षरे दाखवतो. 


हा दुसरा लेवल आहे. यामध्ये एक श्वान आणि एक मांजर दिसते. मध्य भागातील ब्लॉक उजवीकडे नेल्यास पूर्वीप्रमाणे तुम्ही श्वानाला काही शब्द म्हणायला लावू शकता. श्वानाच्या चित्रावर क्लिक केल्यास ड्रॉप डाउन मेनू उघडतो. आणि त्यामध्ये मांजराचे चित्र सेलेक्ट करा आणि ते उजवीकडे नेवून ठेवा. सारे ब्लॉक्स एकमेकाला चिटकलेले असावे.
   

त्यानंतर तुम्ही दोन्ही ब्लॉक्स च्या टेक्स्ट बॉक्स मध्ये काही तरी लिहून रन बटणावर क्लिक करा. तुम्हाला दोन्हीही प्राणी काहीतरी बोलत असलेले दिसतील.


हा तिसरा लेवल आहे. यामध्ये आपल्याला कुत्र्याला मांजराकडे म्हणजे उजवीकडे हलवायचे असते. त्यासाठी आपल्याला मध्य भागातील ब्लॉक्सचा वापर करावयाचा असतो. आपण यासाठी उजव्या बाणाच्या चित्राचा वापर करू. हा ब्लॉक उजव्या भागात भगव्या ब्लॉक च्या खाली नेवून ठेवावा व रन बटणावर क्लिक करावे म्हणजे कुत्रा मांजराकडे चालत जाईल.  

हा चौथा लेवल आहे. यामध्ये मी फक्त कोडिंग चा भाग दाखवला आहे. पहिल्यांदा आपण कुत्र्याला उजवीकडे चालत जाण्यास सांगू. त्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कोड ब्लॉक दिसतो. यामध्ये एक कंडीशनल स्टेटमेंट दिसते. 
जर दोन चित्रे एकमेकाजवळ आली तर पुढे काय. त्यासाठीआपण एक ब्लॉक निवडला आहे. यामध्ये आपण मांजराचे चित्र निवडू आणि त्याच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये "Hello"  असे लिहू.
आता रन बटणावर क्लिक केल्यास कुत्रा मांजराकडे चालत जातो आणि मांजर त्याला हेल्लो म्हणते असे आपल्याला दिसते. 

हा पाचवा लेवल आहे. यामध्ये आपल्याला एक ऑक्टोपस दिसतो. त्याचे डोळे मिटलेले आहेत. आणि आपल्याला त्याचा मूड बदलायचा असतो. मध्यभागातून सेट मूड नावाचा ब्लॉक उजवीकडे सरकवावा. तो भगव्या रंगाच्या ब्लॉक खाली ठेवावा. आणि त्यानंतर स्माइली वर क्लिक करावे, तर तुम्हाला बरीचशी आइकॉन्स दिसतील. त्यामधून हसत असलेले  आइकॉन निवडावे. नंतर रन बटण दाबावे. असे केल्यास ऑक्टोपसचा मूड बदलून तो हसत असलेला आपल्याला दिसतो.

ही सहावी लेवल आहे. आतापर्यंतच्या लेवल्स मध्ये आपल्याला कमांड ब्लॉक्स वापरून अॅनिमेशन कसे करता येते याचा सराव झाला. या लेवल मध्ये आपल्याला आणखीनही अधिक कमांड ब्लॉक्स दिसतात. आणि या कमांड ब्लॉक्स चा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुत्रा आणी मांजराचे अॅनिमेशन बनवू शकता. या ठिकाणी तुम्हाला जर कुणाची मदत हवी असल्यास आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घ्यावी. 
  





टिप्पण्या