स्केचअप मधील मेनू ऑप्शंस

मागील पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही गूगल स्केचअप 2015 डाउनलोड करून इंस्टाल केला असेल तर तुम्हाला एक महिन्यासाठी स्केचअप चे प्रो व्हर्जन वापरायला मिळते. एका महिन्यानंतर प्रो व्हर्जन बंद होतो आणि फ्री व्हर्जन ला सुरवात होते. आपण जी माहिती घेणार आहोत ती सर्व फ्री व्हर्जन बद्दलच असेल. या  फ्री व्हर्जन ला कोठलीही काल मर्यादा नाही.

    येथील चित्रामध्ये स्केचअपचे विंडोज 10 च्या डेस्कटॉप वर दिसत असलेले आईकॉन दिसते . यावर डबल क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होते.





येथे सर्वात खाली उजवीकडे आपल्याला "स्टार्ट युजिंग स्केच अप" असे लिहिलेले बटन दिसत आहे. ही स्क्रीन स्केच अप प्रो चे एक महिन्याचे ट्रायल संपल्यानंतरचे आहे. स्केचअप च्या या फ्री व्हर्जन मध्ये थोडेसे मेनू कमी दिसतील, पण त्याची काळजी करण्याची गरज नाही.  

खाली दिसत असलेले चित्र हे स्केचअप मेक च्या मेनू चे आहे. आपण या मेनू मधील ओप्शंस ची ओळख करून घेऊ. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, कि जेव्हा तुम्ही एखादे टूल निवडाल तेव्हा माउस चे पॉइंटर त्या टूलच्या आईकॉन प्रमाणे दिसू लागते.


यामधील पहिले बाणासारखे सेलेक्ट टूल आहे.  
याचा वापर करून एखादे ड्रॉइंग सेलेक्ट करता येते. स्केचअप मधेल कोणती ही वस्तु एडिट करण्यासाठी पहिल्यांदा सेलेक्ट करावी लागते.
येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, की जेव्हा तुम्ही एखादे टूल निवडाल तेव्हा माउस चे पॉइंटर त्या टूलच्या आईकॉन प्रमाणे दिसू लागते.



खोड रबरा सारखे असलेले इरेजर टूल आहे. तुम्ही काढलेल्या स्केचचा एखादा भाग खोडण्यासाठी याचा वापर होतो. 





लाईन आणि फ्रीहँड टूल. याचा वापर रेषा ओढण्यासाठी किंवा  फ्रीहँड वापरून एखादी आकृती काढण्यासाठी होतो.




आर्क टूल चा वापर वेगवेगळ्या प्रकारचे आर्क आणि पाई ची आकृती काढण्यासाठी होतो











शेप्स टूल चा वापर चौकोन, वर्तूळ, आणि पॉलीगॉन इत्यादी काढण्यासाठी होतो






पुश-पुल टूलचा वापर एखाद्या आकृतीला जाडी देण्यासाठी केला जातो. यामुळे थ्री डायमेंशनल इफेक्ट निर्माण होतो


ऑफसेट टूल चा वापर एखाद्या बाउंड्रीचे ऑफसेट काढण्यासाठी होतो


मुव्ह टूल चा वापर एखादे ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी होतो. त्याच बरोबर एखादे ड्राइंग काढताना तुम्ही मूव्ह टूल वापरून एखादी लाईन हलवली तर त्याला जोडलेल्या बाकीच्या लाईन्स आपोआप रिसाईझ होतात.   
एखादे ऑब्जेक्ट सेलेक्ट करून मूव्ह टूल ने हलवताना जर  कंट्रोल की दाबून ठेवली तर त्या ऑब्जेक्टची एक कॉपी तयार होवून मूव्ह होते. यानंतर एखादा अंक लिहून / (फॉरवर्ड स्लॅश ) लिहावे, त्यानंतर एन्टर की दाबावी.  असे केल्यास त्या ऑब्जेक्टच्या तेवढ्या प्रती तयार होवून त्या समान अंतरावर ठेवल्या जातात.   



रोटेट टूल चा वापर एखादे ऑब्जेक्ट x, y किंवा z अॅक्सिस मध्ये फिरवण्यासाठी होतो


स्केल टूल चा वापर एखादे ऑब्जेक्ट त्याच्या मूळ आकारापेक्षा लहान किंवा मोठे करण्यासाठी होतो



टेप मेजर टूल चा वापर ड्रॉइंग मधील वेगवेगळ्या ओब्जेक्ट्स मधील अंतर मोजण्यासाठी होतो


टेक्स्ट टूल चा वापर एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल माहिती लिहिण्यासाठी केला जातो 


पेंट बकेट टूल चा वापर मटेरियल लायब्ररी सोबत केला जातो. एखाद्या सरफेसला एखाद्या विशिष्ट टेक्स्चर ने रंगवण्यासाठी  याचा वापर केला जातो.



ऑर्बिट टूल चा वापर एखाद्या ऑब्जेक्टला थ्री डायमेंशन मध्ये फिरवून पाहण्यासाठी होतो


पॅन टूल चा वापर कॅमेरा पॅन करण्यासाठी म्हणजे डावीकडे-उजवीकडे किंवा वर-खाली करून समोरचे दृश्य पाहण्यासाठी होतो



झूम टूल चा वापर समोरचे दृश्य लहान किंवा मोठे करून पाहण्यासाठी केला जातो 

 


गेट मॉडेल्स - येथे क्लिक केल्यावर 3D वेअर हाउस उघडते. तेथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तयार  मॉडेल्स विनामूल्य डाउनलोड करू शकता 


एक्सटेंशन वेअर हाउस - या ठिकाणी क्लिक केल्यास तुम्हाला स्केच अप साठी असलेली वेगवेगळी  एक्सटेंशन डाउनलोड करता येतात. एक्सटेंशन चा वापर एखादे काम सोप्या रीतीने करण्यासाठी केला जातो. काही एक्सटेंशन विनामूल्य असतात तर काही विकत घ्यावी लागतात






या मालिकेतील इतर लेख
* स्केचअप मधील टूलबार
स्केचअप मधील आर्क टूल



स्केचअप मेक हा एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जो आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येतो.

टिप्पण्या