स्केचअपसाठी राउंड कॉर्नर प्लगइन

आज आपण स्केचअपसाठी राउंड कॉर्नर या नावाच्या प्लगइन बद्दल माहिती घेऊ. हा प्लगइन फ्रेडो 6 असे टोपण नाव असलेल्या डेव्हलपरने बनवला आहे.  हा प्लगइन तुम्ही स्केचअपमध्ये स्केचुकेशनच्या एक्सटेन्शन स्टोअरमधून इंस्टॉल करू शकता. 

एक्सटेन्शन स्टोअर उघडल्यानंतर त्याला एक्सपांड करून घ्या. व तेथे "Recent" ऐवजी "Full List"  निवडा किंवा "Authors" च्या यादी मधून "Fredo 6" निवडा. व त्यानंतर दिसणाऱ्या यादीमध्ये "Round Corner" हे नाव पहा. या नावा समोर तुम्हाला जांभळा, लाल व हिरवी बटणे दिसतील. लाल बटन दाबल्यावर प्लगइन इंस्टॉल होण्यास सुरवात होते. त्यानंतर दिसणारे वार्निंग मेसेजेस ओके करा. प्लगइन इंस्टॉल झाल्यानंतर त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला स्केचअपचा प्रोग्राम रीस्टार्ट करावा लागतो. त्यापूर्वी राउंड कॉर्नर या नावासमोरील पहिल्या जांभळ्या (पर्पल) बटनावर क्लिक करा,


   त्यामुळे एक वेब पेज उघडेल. या वेब पेजच्या उजव्या बाजूला खाली "फीड बॅक" या नावाचे बटण आहे, त्याला शोधून त्यावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यावर एक नवीन वेब पेज उघडेल. त्यावर डॉक्युमेंटेशन या सदराखाली क़्विक कार्ड राउंड कॉर्नर या नावाची पीडीएफ फाईलची लिंक दिसेल, त्यावर राईट क्लिक करा, व सेव्ह अॅज सेलेक्ट करा व ही फाईल सेव्ह करून ठेवा. यामध्ये तुम्हाला राउंड कॉर्नर या प्लगइन बद्दल इत्यंभूत माहिती वाचायला मिळेल.


 राउंड कॉर्नर प्लग इन इंस्टॉल झाल्यावर स्केचअपचा प्रोग्राम एकदा रिस्टार्ट करून घ्या. आता तुम्हाला राउंड कॉर्नरचे फ्लोटिंग टूलबार दिसू लागेल. तसेच टूल्स मेनू मध्ये फ्रेडो 6 कलेक्शन या नावाखाली तुम्हाला राउंड कॉर्नर चा मेनू पण दिसेल. जर तुम्ही फ्लोटिंग टूलबार काढून टाकला तर या मेनू मधून तुम्ही काम करू शकता. तसेच फ्लोटिंग टूलबार तुम्हाला परत हवा असेल तर View - Toolbars वर क्लिक केल्यास टूलबार्स या नावाचा विंडो उघडतो, त्यामध्ये राउंड कॉर्नर या नावासमोर चेक केल्यास तो परत दिसू लागतो. 

वरील टूलबारमध्ये  तीन मेनूंची चित्रे दिसतात.  ही राउंड कॉर्नर, शार्प कॉर्नर आणि बेवेल्ड एजेस अँड कॉर्नर्स अशी आहेत.
आता आपण या टूलचा एक सोपा उपयोग पाहू .

मी एक स्क़्वेअर काढला आणि त्याला पुश पुल टूल ने जाडी दिली. त्यानंतर ऑफसेट टूलने तीन बॉर्डरचे ऑफसेट काढले, व परत पुश पुल टूल वापरून  त्याला खाली पुश केले. आता हा आकार एखाद्या सोफ्या सारखा दिसतो. याला अधिक चांगले बनवण्यासाठी मी Windows - materials उघडून याला रंग देतो.

यानंतर मी फ्लोटिंग टूलबार मधून पहिले ऑप्शन निवडतो. त्यामुळे माउस पॉइंटरचा आकार बदलतो. तुम्ही तुम्हाला हवी ती, किंवा हव्या त्या बाजू निवडू शकता, कोपरा निवडल्यास तीन बाजू निवडल्या जातात, तसेच एखादा सरफेस निवडल्यास चार बाजू निवडल्या जातात. निवडणे झाल्यास माउसचे पॉइंटर हिरव्या रंगाच्या राईट चिन्हाप्रमाणे दिसू लागते, आता स्क्रीनवर एखाद्या रिकाम्या जागी क्लिक केल्यास निवडलेल्या भागाला राउंड केले जाते. या टूल मध्ये ऑफसेटची वैल्यू तुम्हाला भरावी लागते. तुम्ही जे टेम्पलेट निवडले असेल त्याप्रमाणे काही वैल्यू डिफाल्ट लिहिलेली दिसेल, उदाहरणार्थ 1' (फूट ) जर तुमच्या ड्रॉइंग मधे एक फूटाचे ऑफसेट होत नसेल तर तुम्हाला एरर मेसेज दिसतो.     



यावेळी टूलबार मध्ये Offset च्या खाली दिसणाऱ्या आकड्यावर क्लिक केल्यास एक छोटासा विंडो उघडतो, यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार ऑफसेटची वैल्यू लिहू शकता. तुम्ही पाहिजे ते परिमाण वापरू शकता. feet, inches, meter, cm, mm इत्यादी.
ऑफसेट वैल्यू अॅड केल्यावर ओके बटन दाबा, व स्क्रीनवर रिकाम्या जागी क्लिक करा, मग तुम्ही लिहिलेल्या आकाराच्या ऑफसेटमध्ये  राउंडिंग झालेले तुम्हाला दिसून येईल. राउंडिंगच्या लाईन्स पाहण्यासाठी 
View - Hidden Geometry हे ऑप्शन निवडा.

तर वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर किंवा इमारतींचे मॉडेल बनवणे सोपे होण्यासाठी या प्लगइनचा निश्चितच उपयोग आहे.

स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.

टिप्पण्या