स्केचअपचे ऑफसेट टूल

स्केचअपचे एक महत्वाचे टूल आहे ऑफसेट टूल. या ठिकाणी ऑफसेट म्हणजे एखाद्या लाईन, लाईन्स किंवा कर्व्हपासून ठराविक अंतरावर काढलेली किंवा काढलेल्या रेषा. 

यामुळे एखाद्या ड्रॉइंगला ठराविक जाडी देता येते, आणि त्यानंतर पुश पुल टूल वापरून त्याला थ्री डायमेन्शनल आकार देता येतो. जर आपण काढलेला आकार क्लोज्ड लूप असेल, म्हणजे त्याला जर स्केचअपमध्ये फेस असेल तर ऑफसेट टूलने त्या फेसच्या बाउंडरीला ऑफसेट लाईन काढली जाते, आणि तुम्हाला हवे असल्यास काही ठराविक लाईन्स पूर्वीच सेलेक्ट करून ऑफसेट टूल वापरल्यास केवळ त्या लाईन्सचे ऑफसेट काढले जाते.   

या ठिकाणी मी दोन चौकोन आणि एक वर्तूळ काढले आहे. त्यापैकी एक चौकोन आणि वर्तुळाला ऑफसेट वापरून आतील बाजूने बाऊउंडरी काढली आहे. तर एका चौकोनाला त्याच्या तीन बाजू पहिल्यांदा सेलेक्ट करून त्यानंतर ऑफसेट टूलचा वापर केला आहे. शिफ्ट टूल वापरून तुम्ही वेगवेगळ्या बाजू वापरू शकता. ऑफसेट टूल वापरताना तुम्हाला ठराविक अंतरावर ऑफसेट काढायचे असल्यास कीबोर्डवर तो नंबर टाईप करावा व त्याचे युनिट ही लिहावे, उदाहरणार्थ 2' (2 फूट) , 50 mm इत्यादी.  तुम्ही एखाद्या लाईन किंवा कर्व्हचे देखील ऑफसेट काढू शकता,  पण ते क्लोज्ड लूप ( फेस ) नसल्यास त्याला पुश पुल टूल वापरता येत नाही.


आता मी या शेप्समध्ये ऑफसेटच्या बाउंड्रीचा आतील भाग सेलेक्ट करून डिलीट करतो. त्यामुळे बाउंड्री वॉलला निश्चित जाडी मिळेल. यानंतर मी पुश पुल टूल वापरून त्यांना थ्री डायमेंशनल आकार देतो.
   


तर अशा रीतीने ऑफसेट टूलचा वापर स्केचअपमध्ये केला जातो 

स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.

टिप्पण्या