स्केचअप मधील आर्क टूल


आज आपण स्केचअपमधील आर्क टूलचा उपयोग कसा करावा हे पाहू. आर्क टूल तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने उघडू शकता. तुमच्या टूल बार मध्ये आर्क टूलचा आइकॉन दिसत असेल तर त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन चार आइकॉन दिसतील. 

हे आईकॉन आर्क, 2 पॉइंट आर्क, 3 पॉइंट आर्क आणि पाईचे आहेत.  यामधील तीन आर्कपैकी कुठल्याही आइकॉन वर क्लिक केल्यास आर्क, आणि पाई चा आईकॉन वापरून पाई बनवता येतो. 

जर तुम्ही "लार्ज टूलसेट" इनेबल केला असेल तर हे चारही  आइकॉन तुम्हाला वेगवेगळे दिसतील. 

तुम्ही मेनूबारमध्ये आर्क्स या मेनू वर क्लिक करून देखील या मेनूंचा वापर करू शकता. 

आर्क टूल निवडल्यावर तुम्हाला एक प्रोट्रॅक्टर (protractor) दिसेल . 

याला पेजवर कुठेही ठेवून क्लिक केल्यास आर्कचे सेंटर बनते. त्यानंतर माउस पॉइंटर सेंटर पासून दूर न्या आणि एका ठिकाणी ठेवून क्लिक करा. यामुळे आर्कचा पहिला पॉइंट तयार होईल. यानंतर जेव्हा तुम्ही माउस पॉइंटर हलवाल तेव्हा आर्क बनत असलेला दिसून येईल. आता आर्कचा दूसरा पॉइंट निश्चित करण्यासाठी क्लिक करा. आपला आर्क बनत असलेला तुम्हाला दिसेल.
याचप्रमाणे तुम्ही टू पॉइंट आर्क आणि थ्री पॉइंट आर्क तसेच पाई देखील बनवू शकता.



स्केचअप मेक हा एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जो आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येतो.

टिप्पण्या