फ्रूट फोटोज अॅप अँड्रॉईड फोनसाठी

आज आपण फळे आणि भाजीपाल्याची माहिती देणाऱ्या Wordex या कंपनीच्या अॅपची माहिती घेऊ. हे अॅप विनामूल्य आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकारची 18 फळे,  17 भाज्या आणि 8 प्रकारच्या सुका मेव्याची चित्रे आणि  नावे उच्चारासह दर्शविली जातात . तसेच यामध्ये एक मेमोरी गेम आणि एक मॅचिंग गेम देखील आहे.

पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "Fruit Photos" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.


या अॅप चा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅपबद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.

हा अॅप इंस्टाल करण्यासाठी कुठल्याही विशेष परमिशनची आवश्यकता नाही. तुम्ही अॅप इंस्टाल करताना कदाचित या परमिशन्स कडे लक्ष देत नसाल. पण अॅप चालण्यासाठी आवश्यक नसलेली परमिशन्स  मागणारे पब्लिशर या परमिशन्स चा वापर करून तुमच्या स्मार्टफोनवर नको  तितक्या जाहिराती दाखवू शकतात, एवढेच नाही तर यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील माहिती त्या पब्लिशर कडे गोळा होते आणि हया माहितीचा गैरवापर देखील केला जावू शकतो . यासाठी मी या ब्लॉगसाठी अॅप्स निवडताना या परमिशन्स लक्षपूर्वक वाचतो आणि अनावश्यक परमिशन्स मागणारे अॅप टाळतो.


हा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो

हा अॅप उघडल्यानंतर  त्याचा स्क्रीन असा दिसेल


हा अॅप कसा वापरावा हे तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता


टिप्पण्या