स्मार्ट फोनवर इंटरनेटचे सेटिंग कसे करावे

जेव्हा आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये सिम कार्ड टाकतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईल नेटवर्क कंपनी कडून आपण निवडलेल्या प्लान प्रमाणे इंटरनेट साठी सेटिंग चा (sms) पाठवला जातो, त्याला आपल्याला इंस्टाल करावे लागते. कदाचित तुमच्या फोनवर हे तुम्हाला दुकानदाराने करून दिले असेलही. पण जर तुम्ही 2g, 3g, 4g इंटरनेट डाटा प्लान बदलले तर configuration sms तुम्हाला परत पाठवला जातो, अशा वेळी हे  configuration settings कसे इंस्टाल करावे हे आपण पाहू.

पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर मेसेज च्या अॅप वर टच करा.
हे आईकाॅन वेगवेगळ्या स्मार्ट फोन वर वेगवेगळे दिसत असेल.
तरी ते उघडल्यास तुम्हाला (sms) मेसेजेस दिसतील. त्यामध्ये एक एक मेसेज दिसत असेल तर वरील बाजूस डाव्या कोपऱ्या वर टच केल्यास या (sms) ची यादी दिसू लागेल.
ही यादी दिसणे महत्वाचे आहे, कारण त्यानंतर फोनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यावर  असलेल्या मेनू ला टच केल्यास कॉनटेक्स्ट मेनू उघडतो.

या मेनू मध्ये तुम्हाला "configuration message" हा पर्याय दिसून येईल.
तो सेलेक्ट  केल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईल नेटवर्क कंपनीने पाठवलेले कॉनफिगरेशन मेसेज दिसतील.
या पैकी नवीन मेसेज उघडावा.


मेसेज उघडल्यानंतर त्याच्या खालील बाजूस "Full install" लिहिलेले दिसेल, त्यावर टच करावे म्हणजे इंटरनेट च्या सेटिंग्ज इंस्टाल होतील.


टिप्पण्या