इंटरनेट एक्स्प्लोरर मधील दोष

संगणक सुरक्षे मध्ये कार्य करणाऱ्या एका कंपनीने मायक्रो सॉफ्ट च्या इंटरनेट  एक्स्प्लोरर ब्रावुजर मध्ये असलेला एक दोष उघडकीला आणला आहे.  मूळ बातमी येथे पहा.

या दोषा मुळे इंटरनेट  एक्स्प्लोरर ब्रावुजर मध्ये एखादी जाहिरात दिसत असताना ज्या व्यक्तीने ती जाहिरात दिली आहे ती व्यक्ती तुमच्या संगणकावर तुम्ही करत असलेल्या माउस च्या हालचाली त्याच्या संगणकावर बसून पाहू शकतो. आणि याचा दुरुपयोग जेव्हा तुम्ही व्हर्चुअल की  बोर्ड वापरून लोग इन करता तेव्हा तुमचा इमेल आयडी व पास वर्द तसेच बँक खात्या संबंधी माहिती समोरील व्यक्तीस कळते. अर्थात सर्वच जाहिराती दिसत असताना असे होते असे नाही. पण जाहिरातींचे विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांना ही माहिती उपलब्ध होवू शकते.

यावेळी  सुरक्षा कंपनीने ही बाब उघडकीला आणली आहे. आणि मायक्रो सॉफ्ट ने ही बाब स्वीकार केली आहे (बातमी ). इंटरनेट एक्ष्प्लोरर च्या ( ६ ते १० ) संस्करणामध्ये अशा प्रकारची त्रुटी आढळून आली आहे.
यामध्ये तुम्हाला करता येण्या सारख्या बाबी अशा.

१) इंटरनेट एक्स्प्लोरर ब्रावुजर चा वापर थांबवा. त्या ऐवजी फायरफॉक्स किंवा गुगल चे क्रोम  ब्रावुजर वापरा.
२) ब्रावुजर मध्ये जाहिराती दिसणे बंद करण्यासाठी एड ब्लॉक या प्लग इन चा वापर करा.

टिप्पण्या