मंगलवार, 10 जनवरी 2017

Servo motor Arduino Uno in Marathi


या प्रयोगामध्ये आपण एक सर्व्हो मोटर वापरू. रोबोट्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. वरील चित्रात दिसत असलेली मोटर ही Tower Pro SG 90. आहे. ही छोटीशी मायक्रो सर्व्हो मोटर दोनशे रुपयापर्यंत मिळते. 
खालील चित्रात याचे कनेक्टर पिन दिसत आहे.


याच्या पिनला तीन वायरी असतात. नारंगी, लाल आणि तपकिरी ( ऑरेंज, रेड आणि ब्राऊन ) तीन वायरी आहेत. यामध्ये रेड आणि ब्राऊन ला पॉवर सप्लाय 5 V चा द्यावा. रेडला पॉजिटिव 5 V अणि ब्राऊनला ग्राउंड. आणि ऑरेंज वायर सिग्नल ची आहे.

 ही वायर तुम्ही आरडूइनोच्या डिजिटल पिनापैकी PWM लिहिलेल्या कोणत्याही एका पिनला जोडू शकता.

त्यानंतर मोटारीच्या शाफ्ट ला जोडण्यासाठी तीन वेगवेगळ्या आकाराचे आर्म्स यासोबत मिळतात, त्या[ पैकी एक आर्म जोडलेला वरील चित्रात दिसतो.

सर्व्होच्या पिनला आरडूइनोच्या बोर्डशी जोडण्यासाठी तीन छोट्या वायारींचा उपयोग करा. यासाठी तुम्ही कुठल्याही रंगाच्या वायरी वापरू शकता.
यानंतर आपण आरडूइनो साठी वापरला जाणारा प्रोग्राम पाहू. हा प्रोग्राम तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. Servo.ino या नावाचा हा प्रोग्राम डाउनलोड करून आरडूइनोच्या एडिटर मध्ये उघडा.

https://goo.gl/KoJTxK

या प्रोग्राम मधील कोड खालील प्रमाणे आहे.

#include
या ओळीमध्ये आपण Servo.h या नावाची लायब्ररी किंवा हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये वापरू.

Servo myservo;
येथे आपण myservo या नांवाचे एक Servo ऑब्जेक्ट बनवले.

void setup()
{
  myservo.attach(9);
}

या ठिकाणी आपण या सर्व्होला नऊ नंबरच्या पोर्टशी जोडतो.

void loop()
{
  myservo.write(90);
  delay(1000);
  myservo.write(180);
  delay(1000);
  myservo.write(0);
  delay(1000);
 }


या ठिकाणी आपण या सर्व्होला 180 डिग्री ने फिरवतो. हा सर्व्हो  0 ते 180 डिग्री पर्यंत फिरवता येतो. आणि प्रत्येक वेळी आपण1000 मिली सेकंदाचा म्हणजे एक मिनिटाचा अवकाश घेतो.

तर समजण्यास सोपा असा हा प्रोग्राम आहे. या व्यतिरिक्त आपण सर्व्होच्या शाफ्टच्या फिरण्याचा वेग ही नियंत्रित करू शकतो.  

हा प्रोग्राम डाउनलोड करून त्याला आरडूइनोच्या IDE मध्ये उघडा. त्यातील मेनू खालील प्रमाणे दिसतील.

 या मधील पहिले आईकॉन हे Verify चे आहे. त्यावर क्लिक करा. Verification पूर्ण झाल्यावर खाली त्याचा एक मेसेज दिसेल. त्यानंतर दुसरे  आईकॉन हे अपलोड चे आहे त्यावर क्लिक करा. यावेळी तुमचा आरडूइनो चा बोर्ड कॉम्प्युटरशी जोडलेला असावा. तर हा प्रोग्राम बोर्डवर अपलोड होईल. त्यानंतर लगेचच तुम्हाला सर्व्हो चा शाफ्ट फिरत असलेला दिसू लागेल. 

शनिवार, 31 दिसंबर 2016

Temperature Sensor Arduino in Marathi

या प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम लिहिणार आहोत तो तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
https://goo.gl/o4vu4V

हा प्रोग्राम डाउनलोड करून तो Arduino च्या IDE मध्ये उघडा. हा प्रोग्राम कशा रितीने लिहिला गेला आहे ते आपण समजावून घेऊ.

void setup()
{
Serial.begin(9600);
}
setup हा Arduino च्या प्रोग्राम मध्ये वापरला जाणारा पहिला फंक्शन आहे. यामध्ये आपण प्रयोगासाठी आवश्यक बाबी सेट करतो.

Serial.Begin हा Arduino चा बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन ने सीरिअल पोर्टशी Arduino ला जोडले जाते आणि त्याच्या कम्युनिकेशन साठी 9600 चा बॉड रेट फिक्स केला जातो.

void loop()
{
loop हा Arduino चा दुसरा फंक्शन आहे.

  float V, C, F;
या ठिकाणी आपण  V, C आणि F या नावाचे तीन floating variables डीक्लेअर करतो.

  V = getVoltage(0);
getVoltage हे आपण लिहिलेले फंक्शन आहे. यामध्ये लिहिलेले (0) हा आपण वापरत असलेल्या Analog पोर्ट चा क्रमांक आहे.  या फंक्शनच्या नावाप्रमाणे  A0 या analog पोर्टला टेम्पेरेचर सेन्सर च्या सिग्नल पिन पासून मिळणारे व्होल्टेज मोजले जाते.

 C = (V - 0.5) * 100.0;
हा फ़ॉर्मूला मिळालेल्या व्होल्टेज पासून डिग्री सेंटीग्रेड मध्ये तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. हा या सेन्सर च्या डाटा शीट मध्ये दिलेला आहे.

  F = C * (9.0/5.0) + 32.0;
तापमानाला डिग्री सेंटीग्रेड पासून फॅरेनहाइट मधे बदलण्यासाठी वापरला जातो.

  Serial.print("voltage: ");
  Serial.print(V);
  Serial.print("  deg C: ");
  Serial.print(C);
  Serial.print("  deg F: ");
  Serial.println(F);

हे कमांड स्क्रीन वरील सीरिअल मॉनिटर वर V , C , आणि F या variables च्या values लिहिण्यासाठी वापरलेले आहेत.

delay(1000);
प्रत्येक वेळी values लिहिल्यावर 1000 मिली सेकंद म्हणजे एक मिनिट थांबण्यासाठी.

float getVoltage(int P)
{
   return (analogRead(P) * 0.004882814);
}

getVoltage या फंक्शन मध्ये जे व्होल्टेज मोजले जाते ते AnalogRead() हे फंक्शन वापरून. AnalogRead()  हे Arduino चे बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये आपल्याला ज्या पिन मधील व्होल्टेज मोजायचे आहे ते द्यावे लागते.

हा प्रोग्राम वर दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा. त्यानंतर त्याला Arduino च्या IDE मध्ये उघडा. त्यानंतर Verify व नंतर Upload चे बटण दाबा म्हणजे प्रोग्राम Arduino च्या बोर्ड वर अपलोड होईल. त्यानंतर स्क्रीन च्या वरील भागात उजव्या कोपऱ्यातील Serial Monitor वर क्लिक करा म्हणजे  Com3 या नावाने एक नवीन विंडो उघडेल व त्यामध्ये तुम्हाला Voltage, Degree C, आणि  Degree F समोर तुमच्या रूम मधील तापमान दिसू लागेल. हे तापमान दर मिनिटाला अपडेट होत असलेलेही दिसेल.

शुक्रवार, 30 दिसंबर 2016

Arduino Uno in Marathi

या लेखापासून आपण Arduino Uno बद्दल माहिती घेऊ. Arduino Uno हा  ATMEL ATMEGA 328  मायक्रो कंट्रोलरचा बोर्ड आहे. या बोर्डवर आपल्याला खालील गोष्टी दिसून येतील.


14 digital input/output pins (त्यापैकी  6  PWM outputs), 6 analog inputs, एक 16 MHz crystal oscillator,  USB connection, एक power jack, एक ICSP header, आणि एक reset button.

या बोर्डवरील मायक्रो कंट्रोलरला प्रोग्राम करण्यासाठी आपल्याला आपल्या संगणकावर एक सोफ्टवेअर इंस्टॉल करावे लागते, त्याला Arduino IDE म्हणतात.


या एडिटर मध्ये प्रोग्राम लिहून ते आपण Arduino Uno च्या बोर्डवर अपलोड करू शकतो. त्यानंतर हवे असल्यास 9 V ची एक बॅटरी जोडून तुम्ही त्याला कॉम्प्युटर पासून वेगळे करू शकता. हा अपलोड केलेला प्रोग्राम जेव्हापर्यंत सप्लाय असेल तोपर्यंत एका लूप मध्ये सतत चालूच राहतो.

या बोर्ड बद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी मी एक व्हिडीओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.


सोमवार, 17 अक्तूबर 2016

व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे

जर तुम्हाला लिनक्स बद्दल माहिती नसेल आणि लिनक्स वापरून पाहण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने लिनक्स तुमच्या विंडोजच्या कॉम्प्युटर वर इंस्टॉल करू शकता. लिनक्स इंस्टॉल करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकी ड्यूअल बूट हा एक मार्ग आहे. पण ते थोडेसे क्लिष्ट आहे. सुरवातीला लिनक्स वापरून पाहण्याचा सोपा मार्ग म्हणजे व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे. ओरेकलचे व्हर्चुअल बॉक्स व्हर्चुअल मशीन नावाचे सोफ्टवेअर यासाठी वापरता येते. पहिल्यांदा हे सोफ्टवेअर इंस्टॉल करावे व त्यानंतर तुम्हाला हवा असलेला लिनक्सचा ISO इमेज डाउनलोड करावा व त्याला व्हर्चुअल बॉक्स मध्ये इंस्टॉल करावे. असे केल्यास लिनक्सचे इंस्टालेशन व्हर्चुअल डिस्क मध्ये होते. व विंडोज वापरत असताना एखादा प्रोग्राम उघडावा त्याप्रमाणे लिनक्स वापरता येतो. हे कसे करावे हे मी सविस्तर एका व्हिडीओ मध्ये दाखवले आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.-------------------------------------------------------------

एकदा उबुंटू  इंस्टॉल  केल्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम येवू शकतो, तो म्हणजे उबुंटू स्टार्ट झाल्यानंतर स्लो चालणे. असे होत असल्यास त्याला नीट  करण्यासाठी काही मार्ग खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत, ते पाहावे.
-------------------------------------------------------------

सोमवार, 9 मई 2016

गेम बनवूया - तोफ उडवायचा गेमवरील चित्रावर  क्लिक केल्यास या गेमला सुरवात होईल. यामध्ये एक तोफ आहे जी बॉल फेकते. या तोफेला लेफ्ट आणि राईट अॅरो कीज वापरून डावी - उजवीकडे फिरवता येते.